कुंभार्ली घाटात सुरक्षा भिंत कोसळली, लोखंडी रेलिंगही तुटलेले; आता बाजूला दगड लावून मलमपट्टी, दुरुस्ती कधी?

कुंभार्ली घाटातील धोकादायक स्पॉट कमी करून हा घाट पावसाळ्याच्या दिवसातही वाहतुकीसाठी निर्धोक होईल याकरता तातडीने उपाययोजना होणं आवश्यक आहे. मात्र अद्याप गेल्या कित्येक वर्षात तशा स्वरूपाचे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.

काही ठिकाणी केवळ संरक्षक कठडे बसवणं या पलीकडे फार काम झालेलं नाही.प्रसाद रानडे, रत्नागिरी : कुंभार्ली घाट चिपळूण – पाटण – कराड मार्ग अर्थात कोकण – पश्चिम महाराष्ट्र जोडणारा हा महत्त्वाचा घाट आहे. हा घाट मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याचं चित्र आहे.सध्या घाटातून वाहतूक सुरळीत सुरू आहे, मात्र घाटातील संरक्षक भिंतीचा भाग दरीत कोसळल्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे. ही घटना शुक्रवारी घडली. लोखंडी रेलिंगही तुटलेल्या अवस्थेत संरक्षक भिंतीचा भाग दरीत कोसळल्यानंतर आता तेथील रस्त्याच्या कडेला मोठे दगड लावून ठेवले आहेत. शिवाय बाजूला असलेले लोखंडी रेलिंगही तुटलेल्या अवस्थेत आहेत.अत्यंत महत्त्वाचा म्हणून ओळखला जाणाऱ्या कुंभार्ली घाटात अनेकदा पावसाळ्याच्या दिवसात दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असतात.याच घाटमार्गे कोकणात दूध, भाजी यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे हा घाट महत्त्वाचा मानला जातो.घाटातील काही स्पॉट हे धोका आहेत, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या घाटातून वाहतूक करताना काळजी घेणे आवश्यक आहे.घाटातील काही स्पॉट हे धोका आहेत, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या घाटातून वाहतूक करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..