अयोध्येतील खोली, शिंदे, नातवंडं अन् तुरुंग; सेनेतील बंडावर राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट.

संजय राऊत यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे बंड करण्यापूर्वीच कल्पना होती. अयोध्या दौऱ्यात शिंदे यांनी राऊत यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. राऊत यांनी सांगितले की, शिंदे मला त्यांच्यासोबत येण्याचा आग्रह करत होते.मुंबई: ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरु असताना शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाआधीचा किस्सा सांगितला आहे. शिंदे पक्ष सोडणार याची कल्पना आम्हाला होती. अयोध्या दौऱ्यात ते माझ्याशी याबद्दल बोलले होते, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी अयोध्या दौऱ्यात घडलेला किस्सा सांगितला.२०२२ मध्ये शिवसेनेच्या इतिहासातील सगळं मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केलं आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. विशेष म्हणजे शिवसेना सत्तेत असताना, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पक्षात उभी फूट पडली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं.

त्यामुळे त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली. इतके आमदार पक्ष सोडून गेले, याची कुणकुण ठाकरेंनी कशी लागली नाही, असाही प्रश्न उपस्थित झाला. त्यावर आता राऊतांनी सविस्तर भाष्य केलं आहे. शिंदेंच्या बंडाची कल्पना होती, ते पक्ष सोडतील, याबद्दल आम्ही अनभिज्ञ नव्हतो, असं राऊत म्हणाले.शिवसेना एकसंध असताना पक्षाचे नेते अयोध्येच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी घडलेला एक किस्सा राऊतांनी सांगितला. ‘एकनाथ शिंदे हा माझा अतिशय जवळचा मित्र. तो मला सांगत होता माझ्यासोबत चल म्हणून. मी म्हटलं तू पण जाऊ नकोस. कशासाठी जाताय? अयोध्येला आम्ही एकत्र होतो. अयोध्येचा आमचा शेवटचा दौरा होता, त्यानंतर शिंदे बाहेर पडले. त्यावेळी शिंदे माझ्या खोलीत येऊन मला समजावण्याचा प्रयत्न करत होते.

शिंदे जाणार होते याची मला कल्पना होती,’ असं संजय राऊत यांनी एबीपी माझावरील एका कार्यक्रमात सांगितलं.शिंदे पक्ष सोडणार याची कल्पना असूनही तु्म्हाला बंड रोखता आलं नाही. याचा अर्थ तुम्ही गाफिल होतात का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर आम्ही गाफिल नव्हतो. शिंदे घाबरुन तिकडे गेले, असं उत्तर राऊत यांनी दिलं. ‘अयोध्येत असताना शिंदे मला म्हणाले होते, आमचं तुरुंगात जायचं वय नाही. बहुधा ही गोष्ट मी पुस्तकात लिहिली आहे. ते म्हणाले, आता मला नातवंडं झाली आहेत. मी म्हटलं आता मलाही नातवंडं झाली आहेत. म्हणून काय ज्या पक्षानं आपल्याला इतकं काही दिलं, त्याच्या छातीवर पाय ठेवून बाहेर पडायचं का? हे मी बाळासाहेबांशी प्रतारणा केल्यासारखं होईल. तु्म्ही धीर धरा, शांत राहा आणि घाबरु नका, असं मी त्यांना सांगितलं होतं. पण हे डरपोक लोक गेले. भित्रे होते, म्हणून गेले,’ अशा शब्दांत राऊत यांनी शिंदेंवर तोंडसुख घेतलं.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..