वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणला न्यायालयीन कोठडी; नेपाळ सीमेवरून पोलिसांनी आवळल्या होत्या मुसक्या.

पुण्यात वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर अनेक खुलासे झाले. तिच्या कुटुंबियांनी हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप केला. वैष्णवीला पती, सासरे, सासू-ननंदेने मारहाण केली. जमीन खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा दबाव होता.वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. वैष्णवीच्या कुटुंबियांनी आपल्या लेकीचा हुंड्यासाठी छळ केला असल्याचा आरोप केला आहे. हेच नाही तर मृत्यूच्या काही तास अगोदरही वैष्णवीला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण करण्यात आली. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा देखील आढळून आल्या. पोलीस तपासात हे स्पष्ट झाले की, वैष्णवीला पती शशांक याने पाईपाने मारहाण केली होती. फक्त पतीच नाही तर सासू लता हगवणे आणि ननंद करिश्मा यांनीही तिला मारहाण केली होती. जमीन खरेदी करण्यासाठी दोन कोटी रूपये माहेराहून आणण्यासाठी वैष्णवीवर दबाव होता.

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे बाळ कसपटे कुटुंबियांकडे देण्यात येत नव्हते. ज्यावेळी लेकीचे बाळ आणण्यासाठी कसपटे कुटुंबिय करिश्मा हगवणे हिचा मित्र निलेश चव्हाण याच्याकडे गेले, त्यावेळी त्याने बंदूकीचा धाक दाखवत त्यांना बाळ दिले नाही. हेच नाही तर त्याने निलेश चव्हाण हा फरार होता. एका अनोळखी व्यक्तीने वैष्णवीच्या बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांकडे दिला. निलेश चव्हाण याच्यावरही वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोप करण्यात आली.निलेश चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो काही दिवस फरार होता. शेवटी पोलिसांनी त्याला नेपाळ सीमेवरून अटक केली. तो सतत आपले लोकेशन बदलत होता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणला अटक केल्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांचा मोबाईल फोन त्याच्याच घरात सापडला.

वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेशची कसून चाैकशी पोलिसांकडून करण्यात आलीये.आज निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांकडून निलेश चव्हाणची पोलीस कोठडीची मागणी करण्यात नाही आली. निलेश चव्हाणला 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 13 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तो असणार आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचेही नाव चर्चेत आले आहे. सध्या वैष्णवीच्या बाळाचा ताबा हा तिच्या आई वडिलांकडे आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..