पत्नीचा राग काढला थेट दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर; रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी, एकाला अटक.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गाझियाबादमधून आरोपीला अटक केली आहे.दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने मोठी खळबळ उडाली. आता पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी गाझियाबादमधून एकाला अटक केलीये. पोलिसांनी धमकीचा फोन आल्यानंतर ही बाब गांभीर्याने घेतली. आरोपीने दारूच्या नशेत फोन केल्याचे सांगितले जात आहे. आरोपीने पोलिसांना सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. हेच नाही तर काही धक्कादायक कागदपत्रेही त्याच्याकडे सापडली आहेत. सध्या आरोपीची कसून चाैकशी केली जात आहे.मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी गाझियाबादमधून एकाला अटक केली. आरोपीने दारूच्या नशेत धमकीचा फोन केल्याचे सांगितले, परंतु पोलीस या प्रकरणाची अधिक गांभीर्याने चौकशी करत आहेत.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना गुरुवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली.गाझियाबाद पोलीस स्टेशनमध्ये 112 नंबरवर कॉल करून ही धमकी देण्यात आली होती. हेच नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर आरोपीने आपला फोन नंबर देखील बंद केला. दिल्ली पोलीस आणि गाझियाबाद पोलीस यांच्याकडून धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. ज्यावेळी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या, त्यावेळी त्याने सांगितले की ज्यावेळी त्याने फोन केला होता, त्यावेळी तो दारूच्या नशेत होता.पोलिसांनी त्याला विचारले असता, त्याने सांगितले की आपल्याला या कॉलबद्दल काहीही माहिती नाही.

आरोपीचे एलएलबीपर्यंत शिक्षण झाल्याचीही माहिती पुढे आली. आरोपीची पत्नी त्याला सोडून गेल्याने तो मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती मिळतंय. पत्नी सोडून गेल्याने त्याला दारूची देखील सवय लागली. दारूच्या नशेतच त्याने दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हेच नाही तर पोलिसांना आरोपीच्या जवळ काही फेक आयडी कार्ड देखील मिळाली. पोलिसांकडून या प्रकरणी कसून तपास हा केला जात आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.