उसने घेतलेल्या पैशांवरुन वाद, रिक्षा चालकाने महिलेला संपवलं; नंतर स्वत: … पुण्यात खळबळ.

 पुण्यात पैशांच्या देवाणघेवाणीतून एका रिक्षाचालकाने महिलेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धायरी परिसरात ही घटना घडली असून, पैशांच्या वादातून हा प्रकार घडला. पुण्यात हत्या, मारामारी, धमकी अशा गुन्ह्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असाच एक हत्येचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा पुण्यात समोर आला आहे. धायरी परिसरात असणाऱ्या रायकर मळा येथे हात उसने दिलेल्या पैशांवरुन मोठा वाद झाला होता. याच झालेल्या वादातून एका रिक्षा चालकाने एका महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेन पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.श्यामली कमलेश सरकार (वय ४०, रा. सूर्यउज्ज्वल हाईट्स, रायकर मळा, धायरी, सिंहगड रस्ता) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी नितीन चंद्रकांत पंडित याला अटक केली आहे.याबाबत सिंहगड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्यामली सरकार आणि नितीन पंडित यांची जुनी ओळख होती. श्यामली ही कामानिमित्ताने शहरात नितीनच्या रिक्षाने येत होती. त्यामुळे दोघांची ओळख झाली होती. यादरम्यान श्यामली हिला पैशांची चणचण निर्माण झाली होती. त्यामुळे तिने रिक्षा चालक नितीन याच्याकडून हात उसने पैसे घेतले होते. ते तिने अनेक दिवस परत केले नाहीत. त्यानंतर नितीनने तिच्याकडून वेळोवेळी पैसे मागण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कारणं देत होती.या पैशांच्या वादातून दोघांमध्ये बुधवारी जोरदार भांडण झालं. रायकर मळा येथे दोघांमध्येची पैसे मागण्यावरून जोरात वाद झाले.

त्याच रागातून नितीन पंडितने श्यामली हिचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला.श्यामलीला आपण रागाच्या भरात संपवल्याचं नितीनच्या लक्षात आलं. भानावर आल्यावर आपल्या हातून अपराध घडल्याचं समजलं आणि तो स्वत: पोलिसात हजर झाला. हत्येनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहाणी केली. त्यानंतर श्यामली हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असून, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या घटनेमुळे धायरी परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. स्थानिक नागरिकांनी अशा घटनांवर नियंत्रणासाठी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.