लवकर येतो म्हणून निघाला, पण कायमचाच निघून गेला, २३ वर्षांच्या तरुणाचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत.

भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने अक्षय आव्हाड नावाच्या २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. अक्षय आव्हाड हा मूळचा खानापूर, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगरचे रहिवासी होता. सध्या तो बारामतीतील श्रीरामनगरमध्ये राहत होता. भिगवण-बारामती रस्त्यावर लामजेवाडीच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघातामुळे दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.इंदापूर तालुक्यातील लामजेवाडीजवळ गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने अक्षय आव्हाड नावाच्या २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. अक्षय आव्हाड हा मूळचा खानापूर, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगरचे रहिवासी होता. सध्या तो बारामतीतील श्रीरामनगरमध्ये राहत होता. भिगवण-बारामती रस्त्यावर लामजेवाडीच्या हद्दीत हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर (क्र. एम.एच. १२ एम. व्ही. ५५६२) भिगवणच्या दिशेने वेगाने जात होता. त्यावेळी कंटेनरने दुचाकीला (क्र. एम. एच. १२ आर एच ३७४६) जोरदार धडक दिली.पोलिसांनी सांगितले की, लामजेवाडी घाटातील वळणावर चालकाला परिस्थितीचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याने दुचाकीला धडक दिली.अपघातामध्ये अक्षय आव्हाड याच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालक ईराणा अलगी (वय ४०, रा. मनकलगी, ता. विजापूर, कर्नाटक) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातामुळे दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.दुसरीकडे, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात एक दुःखद घटना घडली. दानापूर येथील एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला. 5 जून रोजी सायंकाळी ही घटना घडली.

लग्न समारंभातून परत येत असताना महिलेच्या गळ्यातील स्टोल मोटरसायकलच्या चाकात अडकला. त्यामुळे ती खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोक पसरला आहे. सुनील सुरजुसे आणि त्यांची पत्नी सविता दानापूर येथे राहतात. त्यांचे जीवन हलाखीचे होते, पण ते सुखाने संसार करत होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. 5 जून रोजी सुनील आणि सविता अकोला येथे एका लग्नासाठी गेले होते. सविता पतीसोबत घरातून निघाली, पण ती परत येऊ शकली नाही. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.