पाच दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला अन् आक्रित घडलं, २७ वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने तडफडून अंत, व्हिडीओ समोर.

ऋषभ गांधी (२७) यांचा पाच दिवसांपूर्वी साखरपुडा झाला. कार्यक्रमानंतर कुटुंब आनंदी होते. ऋषभ दुकानात कर्मचाऱ्यांसह उपस्थित होता. ते सर्व त्यांच्या दुकानात नरेंद्र मोदी स्टेडियम आणि इतर काही गोष्टींबद्दल चर्चा करत होते. त्यानंतर खुर्चीवर बसलेल्या ऋषभने पाणी पिण्यासाठी समोर ठेवलेली पाण्याची बाटली उचलली. पण झाकण उघडण्यापूर्वीच त्याला हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन एका २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. खुर्चीवर बसलेल्या एका तरुणाने पिण्याच्या पाण्याची बाटली उचलली पण त्याआधीच त्याला हृदयविकाराचा झटका आला. कापड व्यवसायात असलेल्या या तरुणाचा पाच दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. या घटनेच्या वेळी दुकानात इतर चार लोक उपस्थित होते. पण ते फारसे काही करू शकले नाहीत. दुकानात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णवाहीका मागवली.

पण तरुणाला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही हृदयद्रावक घटना कैद झाली आहे.गुजरातच्या सुरत येथील रहिवासी असलेला २७ वर्षीय ऋषभ गांधी याचा अवघ्या ५ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता आणि खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, सुरतच्या कापड व्यवसायात असलेल्या ऋषभ गांधी (२७) यांचा पाच दिवसांपूर्वी साखरपुडा झाला. कार्यक्रमानंतर कुटुंब आनंदी होते. ऋषभ दुकानात कर्मचाऱ्यांसह उपस्थित होता. ते सर्व त्यांच्या दुकानात नरेंद्र मोदी स्टेडियम आणि इतर काही गोष्टींबद्दल चर्चा करत होते. त्यानंतर खुर्चीवर बसलेल्या ऋषभने पाणी पिण्यासाठी समोर ठेवलेली पाण्याची बाटली उचलली.

पण झाकण उघडण्यापूर्वीच त्याला हृदयविकाराचा झटका आला. घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी तात्काळ सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत ऋषभचा मृत्यू झाला.हृदयविकाराची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे की २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू कसा झाला? कुटुंबातील सदस्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे. तर ओळखीच्या लोकांना या घटनेवर विश्वास बसत नाहीये. गुजरातमध्ये यापूर्वीही तरुणांच्या हृदयविकाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. सुरतमधील या ताज्या घटनेने पुन्हा एकदा सर्वांना हृदयविकाराच्या धोक्याबद्दल सावध केले आहे . हृदयविकाराची संपूर्ण घटना काही सेकंदात घडली. जवळ बसलेल्या मित्रांना ऋषभची तब्येत बिघडल्याची कल्पनाही आली नाही.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.