सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतमजुराने संपवलं जीवन; मृत्यूपूर्वी चिट्टीत मारहाणीसह पैशांच्या त्रासाचा उल्लेख.

संतप्त नातेवाइकांनी शवविच्छेदनानंतर मजुराचा मृतदेह थेट मलकापूर शहर पोलिस ठाण्यात नेला. गुन्हे दाखल करून आरोपीस अटक होईपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचे ठणकावले.अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून धरणगाव येथील एका शेतमजुराने विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून सावकाराने केलेली मारहाण, पैशांचा व्यवहार व परतफेड केलेल्या रकमेचा उल्लेख केल्याने संतप्त नातेवाइकांनी शवविच्छेदनानंतर मजुराचा मृतदेह थेट मलकापूर शहर पोलिस ठाण्यात नेला. गुन्हे दाखल करून आरोपीस अटक होईपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचे ठणकावले. अखेर पोलिसांनी सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

धरणगावयेथील शिवाजी घुगरे (४२) यांनी गावातीलच अभिषेक सुनील कापसे याच्याकडून सहा हजार रुपये व्याजाने घेतले होते. व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी कापसे याने तगादा लावला होता. ४० हजार रुपयांची परतफेड करण्यात आली. तरीही कापसे अधिकची रक्कम मागत होता. ३ जूनच्या रात्री शिवाजीच्या घरी येऊन कापसे याने त्यांना बाहेर बोलावले आणि १ लाख २० हजार रुपये मागत मारहाण केली.काही नागरिकांसमक्ष मारहाण झाल्याची बाब घुगरे यांना जिव्हारी लागली. त्यातच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यामुळे हतबल झालेल्या घुगरे यांनी ४ जून रोजी विषारी औषध प्राशन केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बुलढाणा जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मी शिवाजी सुपडा घुगरे. मन:पूर्वक चिठ्ठी लिहितो की, मी अभिषेक कापसेकडून सहा हजार रुपये घेतले होते. मी याची परतफेड ४० हजार रुपये केली. नंतर तो मला अजून पैसे मागायचा. मी त्याला पैसे दिले नाही. तो काल रात्री माझ्या घराकडे आला अन् मला घरातून बोलावून रामदास पाटील यांच्या घरासमोर मारले. रामदास पाटील, मंगेश थोरात, सुनील नेरकर, सुनील ढोले, अमित सोनटक्के हे सर्व घटनास्थळी उभे होते. अभिषेकने मला काल पैसे दे नाही तर मारून टाकेन ही धमकी दिली. याच कारणाने मी आत्महत्या करीत आहे’, असे घुगरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.