जे सोडून गेले ते… उद्धव ठाकरेंनी चंग बांधला, ‘मातोश्री’वरुन आदेश निघाले, आता गद्दारांच्या विरोधात…

गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेत शुक्रवारी आणखी एक भर पडली. उद्धव ठाकरे यांनी याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शुक्रवारी दिवसभर चर्चेचा नवा अध्याय रंगला ‘जे सोडून गेले ते आपले कधी नव्हतेच, जे आहेत त्यांना सोबत घ्या आणि गद्दारांविरोधात वज्रमूठ उभारून शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून द्या, असे आवाहन शिवसेना बाळासाहेव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केले. आगामी महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी ताकद पणाला लावण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी निवड झाल्यानंतर दत्ता गायकवाड यांच्यासह नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. 6) ‘मातोश्री’ ची वारी करीत पक्षप्रमुखांची भेट घेतली. खासदार संजय राऊत हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नाशिकचा हालहवाल जाणून घेतला.

भाजप नेते तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची ‘उबाठा’ला जमीनदोस्त करण्याची भाषा, सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर व्यक्त केलेली नाराजी, त्यानंतर त्यांची पक्षाकडून करण्यात आलेली हकालपट्टीची कारवाई यावर कटाक्ष टाकताना नवनियुक्त उपनेते गायकवाड यांना जबाबदारीची जाणीवही ठाकरे यांनी करून दिली.”जे सोडून गेले ते आपले कधीच नव्हते. जे आहेत त्यांना सोबत घ्या, जुन्या-नव्यांची सांगड घाला आणि पक्षसंघटन मजबूत करा. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकाच्या तयारीला लागा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. यावेळी उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, कोअर कमिटी सदस्या भारती ताजनपुरे, राहुल ताजनपुरे, उपजिल्हाप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, अस्लम मनियार, मसुद जिलानी, बाळा दराडे, सरप्रीतसिंग बल, दीपक गामणे, भूषण भामरे, विक्रम घुगे, सचिन गिते आदी उपस्थित होते.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेत शुक्रवारी आणखी एक भर पडली. उद्धव ठाकरे यांनी याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शुक्रवारी दिवसभर चर्चेचा नवा अध्याय रंगला. ‘जे काही बारकावे आहेत, ते आम्ही पाहत आहोत. बघूया, जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे, ते होईल’, असे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केले.शिवसेनेच्या महिला पदाधिकारी सुजाता शिंगाडे या शुक्रवारी स्वगृही अर्थात शिवसेना (उबाठा) पक्षात परतल्या. त्यावेळी ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी वरील वक्तव्य केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.