घरी एकटेच, बायको आणि मुलगी गावाला, भर दुपारी दार लावलं अन्… पुण्यात शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये खळबळ.

 पुण्यात खळबळजनक घटना घडली आहे. शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. ते खडक पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस लाईन मध्ये राहणारे आणि खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकाच खळबळ उडाली आहे. सचिन हरीश्चंद्र सुर्वे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नावं असून शुक्रवारी दुपारी राहत्या घरी ही घटना घडली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यांची कोंढवा येथे बदली झाली असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी परिसरात चर्चा आहे.याबाबत मिळलेली माहिती अशी की, सचिन सुर्वे हे शिवाजीनगर येथे पोलीस वसाहतीतील नवीन बिल्डिंग येथे राहत होता. त्यांची पत्नी आणि मुलगी गावी गेल्याने ते घरी एकटेच असल्याची माहिती समोर येत आहे. सुर्वे यांनी शुक्रवारी दुपारी त्यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुर्वे यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी सुर्वे यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली आहे.

सुर्वे यांची मुलगी दहावीमध्ये शिकत आहे.सचिन सुर्वे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनाही या घटनेने धक्का बसला असून, त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. मात्र, पोलिसांनी याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप जाहीर केलेली नाही.या घटनेने पुण्यातील पोलीस दलात शोककळा पसरली आहे. सचिन सुर्वे यांच्या आत्महत्येचा तपास करताना पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांचे आणि कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील तणावाबाबतही चौकशी सुरू आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.