नाशकात बरसल्या पर्जन्यसरी; वादळी वाऱ्यासह हजेरी, २ दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज.

 पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. मान्सूनरेषेने मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला असून, अनेक ठिकाणी मान्सून पोहोचला. त्यामुळे उत्तर व मध्य महाराष्ट्रात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.सलग दुसऱ्या दिवशी शहरात बरसलेल्या पर्जन्यसरींमुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (दि.६) सायंकाळी पाच ते पावणेसहा या वेळेत मध्यम स्वरूपात बरसलेल्या सरींमुळे मान्सूनपूर्व कामांचे पितळ उघड पडले आहे. योग्य पद्धतीने नालेसफाई न झाल्याने शहरातील नाल्यांतील पाणी रस्त्यांरून वाहताना दिसून आले. गोदातीरी असलेल्या भूमिगत गटारी ‘ओव्हरफ्लो’ होऊन सांडपाणी नदी पात्रात मिसळले. त्यामुळे यंत्रणेच्या ढिसाळ कामांबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. शहरात गुरुवारी (दि.५) तासाभरात सोळा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शुक्रवारी (दि. ६) अर्धा ते पाऊण तास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सायंकाळी साडेसहा वाजेपासून वातावरण गारठा निर्माण झाला. दिवसभरात ३२.१ कमाल तर २१.३ किमान अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अवकाळी पावसाने मे महिन्यात शहराला चांगलेच झोडपल्याने यंत्रणेसमोर पावसाळीपूर्व कामांचा प्रश्न उपस्थित झाला होता.

मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्यापूर्वी यंत्रणेने कोणताही धडा घेतला नसल्याची टीका नाशिककरांनी केली. शहरात दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे काही रस्त्यांची चाळण झाली आहे.पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. मान्सूनरेषेने मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला असून, अनेक ठिकाणी मान्सून पोहोचला. त्यामुळे उत्तर व मध्य महाराष्ट्रात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.जिल्ह्यात गेला आठवडाभर विश्रांती घेणाऱ्या पावसाचे गुरुवारी ‘कमबॅक’ झाले. शुक्रवारी (दि.६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७.५ मिमी पावसाची नोंद झाली. नाशिक तालुक्यात सर्वाधिक २१ मिमी, तर सिन्नरमध्ये १८.३ मिमी पाऊस नोंदविला गेला.निफाड व परिसरात शुक्रवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तालुक्यातील चांदोरी, पिंपळस, शिवरे, कुंदेवाडी, सोनेवाडी, रसलपूर आदी भागांत पावसाने दुपारी तीनच्या सुमारास दमदार हजेरी लावली.

कसबे सुकेणे, मौजे सुकेणे निफाड कारखाना परिसर या भागातही जोरदार पाऊस झाला. तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत केली होती. ६ ते ७ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. निफाडला आठवडे बाजारात आलेले व्यापारी आणि बाजारहाट करणाऱ्या नागरिकांची धावपळ झाली.कसबे सुकेणे येथे व परिसरातील मौजे सुकेणे, ओणे, थेरगाव या परिसरात शुक्रवारी दुपारी चारपासून सुमारे दीड तास जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वादळी पावसामुळे परिसरातील वस्त्यांवर ठिकठिकाणी झाडे कोसळली, विजेचे खांबही वाकले. ओझर-सुकेणे जिल्हा मार्गावरची वाहतूकही सायंकाळी बंद होती.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.