अजित पवारांचे एकला चलो रे? स्वबळाचा पर्याय खुला ठेवून जिल्ह्यात भाजपला थेट आव्हान देण्याची तयारी

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे स्वबळाचा पर्याय खुला ठेवून जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान देण्याची दिशा स्पष्ट केली.‘पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे. माझा चेहरा घेऊन पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातही नागरिकांसमोर जाऊ,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे स्वबळाचा पर्याय खुला ठेवून जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान देण्याची दिशा स्पष्ट केली.राष्ट्रवादी काँग्रेसचा येत्या दहा जून रोजी वर्धापनदिनाचा कार्यक्रम आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीसाठी जिल्हा बँकेत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत अजित पवार यांनी आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महायुती होणार की नाही, जातनिहाय जनगणना, शहरातील विकासाचे प्रकल्प, कार्यकर्त्यांचा समाजातील वावर, पक्षाची कार्यकारणी कशी असावी, यावर जोरदार टोलेबाजी केली. पवार म्हणाले, ‘राज्यात १९९९ ते २०१४ या दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होते. तेव्हाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली होती. आताही राज्य स्तरावर काही ठरले तरी कदाचित जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याचे सोपवले जाईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागले पाहिजे. युती होणार असे ठरले होते, त्यामुळे आम्ही गप्प बसलो, अशा सबबी चालणार नाहीत,’ अशा स्पष्ट सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

येत्या काळात दर आठवड्याला पुणे आणि पिंपरी-चिचंवडमध्ये कार्यक्रम घेणार आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जीवापाड काम केले तर त्याचा फायदा झाला. त्यानुसार आताही जनतेला विश्वास द्यायचा आहे. पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हाच एकमवे उपाय आहे, हे पटवून द्यायचे आहे. त्यासाठी माझा चेहरा घेऊन पुणे, पिंपरी-चिंचवड; तसेच जिल्ह्यात जाऊ,’ असेही त्यांनी सांगितले. आपल्या पक्षाचे नेते, प्रवक्ते, पदाधिकारी यांनी बोलताना आपल्याच पक्षाच्या नेत्यांना, सहकाऱ्यांना त्रास होता कामा नये, अशा प्रकारची वक्तव्ये असली पाहिजेत. त्यातून नवीन समस्या निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या, असा शब्दांत त्यांनी कान टोचले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार सुनील टिंगरे आणि माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांची नियुक्ती केली आहे. दोघांनाही चार विधानसभा मतदारसंघ वाटून दिले आहेत. त्यापैकी पुणे कँटोन्मेंट मतदारसंघ जो टिंगरेंकडे देण्यात आला आहे, तो आता जगताप यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.

तर, जगताप यांच्याकडील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ टिंगरे यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले.महापालिकेची प्रभाग २०१७, २०२२ की २०२५ नुसार होणार, याबाबत सातत्याने कार्यकर्ते विचारणा करतात. आपले काम चोख असेल, तर अडचण येणार नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांनी समाजातील संपर्क वाढवला पाहिजे. काम करणारा कार्यकर्ता असल्याची भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. आपला स्वभाव कसाही असला तरी मनमिळावू स्वभावाचे रहा, अशा सूचना करताना ‘मी कसा मनमिळावू स्वभावाचा आहे,’ असे म्हणताच मेळाव्यामध्ये हास्याचे फवारे उडाले होते. लोकांना हसरा, सकारात्मक चेहरा आवडतो. त्यामुळे हल्ली मी गप्पा मारताना हसत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांचीही साक्ष काढली. ‘दिलीप वळसे पाटलांशी बोलताना आता मी किती हसत असतो. त्यांना वाटत असेल गेली दहा ते पंधरा वर्षे मी इतका कधी हसलेलो दिसलो नाही. मात्र, आता हसतो आहे,’ असेही त्यांनी मिश्किलपणे सांगताच जोरदार हशा पिकला होता.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.