अजय तावरेनेच ‘तो’ कट रचल्याचे पुरावे, पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद.

घटनेच्या दिवशी रजेवर असल्याचा दावा तावरे याने केला आहे. परंतु, त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले असता, तो डॉ. हाळनोर व अतुल घटकांबळेच्या संपर्कात असल्याचे दिसत आहे.कल्याणीनगर पोर्श अपघातानंतर अल्पवयीन कारचालकासह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरेच मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर व वॉर्डबॉय अतुल घटकांबळेच्या संपर्कात होता. त्यामुळे रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याच्या कटात तावरेचा सक्रिय सहभाग सिद्ध करणारे पुरेसे पुरावे आहेत, अशी माहिती सरकार पक्षातर्फे गुरुवारी विशेष न्यायालयात देण्यात आली.कल्याणीनगर येथे 18 मे 2024 च्या मध्यरात्री अल्पवयीन मुलाने ‘पोर्श’ कार भरधाव चालवून धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू झाला.

कारचालक मुलगा व पाठीमागील आसनावर बसलेल्या दोन मित्रांनी अपघातापूर्वी मुंढव्यातील दोन पबमध्ये मद्यपान केले होते. त्यामुळे रक्ताचे नमुने तपासण्यासाठी सर्वांना ससून रुग्णालयात नेण्यात आले.तिथे या मुलांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल व शिवानी अगरवाल, अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्याशी संगनमत करून शिपाई अतुल घटकांबळेमार्फत ‘ससून’च्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या सर्व आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायदा व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांन्वये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणात सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयात आरोपी अजय तावरे याने निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज केला आहे. त्याला विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विरोध केला. घटनेच्या दिवशी रजेवर असल्याचा दावा तावरे याने केला आहे. परंतु, त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले असता, तो डॉ. हाळनोर व अतुल घटकांबळेच्या संपर्कात असल्याचे दिसत आहे. पालकांच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी त्याने दबाव टाकला.या प्रकरणातील साक्षीदारांनी कबुलीजबाब नोंदविला असून, त्याद्वारे तावरे याची या कटात महत्त्वाची भूमिका निदर्शनास येते, असा युक्तिवाद हिरे यांनी केला. या अर्जावर दहा जून रोजी पुढील सुनावणी रोजी होणार असून, तावरे याचे वकील युक्तिवाद करणार आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.