यावल वनविभाग जळगाव व रेडक्रॉस आयोजित ॲापरेशन सिंदुर व जागतिक पर्यावरण दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

यावल प्रादेशिक वनविभाग व इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने वनपरिक्षेत्र कार्यालय यावल पुर्व येथे “ऑपरेशन सिंदुर रक्तदान अभियान” आयोजीत करण्यांत आले. सध्या देशात उदभवलेली युध्दजन्य परिस्थिती लक्षात घेता मुबलक रक्तसाठा आवश्यकतेनुसार राष्ट्रीय पातळीवर पाठविण्याच्या दृष्टीकोनातुन नियोजन करण्याच्या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले.

सदर कार्यक्रमास यावल प्रादेशिक वनविभागातील क्षेत्रीय कर्मचारी यांनी उत्र्युत प्रतिसाद दिला.त्यानंतर आज रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्य विक्री केंद्र यावल येथे वृक्षारोपण करुन पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. तसेच म.उप वनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगाव जमीर शेख यांच्या संकल्पनेतून वनपरिक्षेत्र यावल पश्चिम मधील मौजे डांभुर्णी शिवारात नरभक्षक बिबट वन्यप्राण्यास अथक परिश्रम घेवून जेरबंद करण्याकरीता वनविभागाचे क्षेत्रीय कर्मचारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबाबत त्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.सदरचा कार्यक्रम म.उप वनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगांव जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल समाधान पाटील, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व स्वप्निल फटांगरे व वनपरिक्षेत्र यावल पुर्व कर्मचारी यांनी आयोजन केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.