सुरेश दोरे हा देवमाळ ठाकुरवाडी येथे राहत होता. तो त्याच्या चार मुलांसोबत राहत होता. सुरेश दोरे याने तीन लग्नं केली होती. पण त्याच्या रागीट स्वभावामुळे दोन पत्नी त्याला सोडून गेल्या. तिसरी पत्नी विमल देखील त्याला सोडून गेली आहे. ती दीड महिन्यापूर्वी त्याला सोडून गेली. विमलची चार मुले मात्र सुरेश दोरे यांच्याकडेच राहत होती.अमूलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका निर्दयी बापाने आपल्याच एक वर्षाच्या मुलीची हत्या केली. सुरेश दोरे असं आरोपी बापाचं नाव आहे. त्याने चिमुकलीला जमिनीवर आपटून मारलं. ही घटना 1 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता घडली. आरोपी सुरेश दोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. वडखळ पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली आहे. कमली हिरामण दोरे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्या आरोपी सुरेश दोरे याच्या नातेवाईक आहेत. पोलिसांनी सुरेश दोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश दोरे हा देवमाळ ठाकुरवाडी येथे राहत होता. तो त्याच्या चार मुलांसोबत राहत होता.










