मला ​पळकुटा ​म्हणा पण… यात ‘चोरी’ कुठे? ​भारतात परतण्यासाठी मल्ल्याची अट, माफीही मागितली.

 विजय मल्ल्याने भारतात परत न परतण्याची कारणे उघडपणे सांगितली आणि किंगफिशर एअरलाइन्सच्या अपयशाबद्दल जाहीरपणे माफीही मागितली. फरार उद्योगपती विजय मल्ल्याने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली पण, त्यासाठी त्यांनी एक अट घातली आहे. मल्ल्याने भारतातील तुरुंगांच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.रॉयल चॅलेंजर बंगळुरूने पहिल्यांदाच IPL चा किताब जिंकल्यापासून प्रसिद्ध उद्योगपती विजय मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी मल्ल्या एका पॉडकास्टमुळे चर्चेत आहेत. मुंबई : रॉयल चॅलेंजर बंगळुरूने पहिल्यांदाच IPL चा किताब जिंकल्यापासून प्रसिद्ध उद्योगपती विजय मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी मल्ल्या एका पॉडकास्टमुळे चर्चेत आहेत.

भारतीय बँकेचा हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करून सध्या लंडनमध्ये फरार उद्योगपती विजय मल्ल्याने पुन्हा मायदेशात परतण्याची इच्छा बोलून सांगितली आहे. तसेच मल्ल्याने आपल्या अलीकडच्या पॉडकास्टमध्ये किंगफिशर एअरलाइन्सच्या कोसळण्यावर वर्षानुवर्षे मौन बाळगल्यानंतर आपले मौन सोडत एक मोठा दावा केला आहे.पुन्हा एकदा भारतात परतण्यासाठी विजय मल्ल्याने सरकारसमोर एक महत्त्वाची अट ठेवली आहे. अलीकडेच विजय मल्ल्याने राज शमानीसोबत पॉडकास्टमध्ये अनेक मुद्द्यांवर उघडपणे भाष्य केले. 4 तासांच्या संभाषणादरम्यान मल्ल्याने त्यांच्यावरील प्रत्येक आरोपाचे उत्तर दिले.यावेळी विजय मल्ल्याने भारतात परतण्याबाबत प्रतिक्रियाही दिली. मल्ल्याने सांगितले की, भारतात निष्पक्ष खटला आणि सन्माननीय जीवनाची हमी नाही त्यामुळे, त्यांचे भारतात परतणे कठीण आहे. मात्र मल्ल्याने एक अट घातली आणि म्हटले की, जर मला भारतात निष्पक्ष खटला आणि सन्माननीय जीवनाची खात्री मिळाली तर मी त्याबद्दल गांभीर्याने विचार करेन.विजय मल्ल्या म्हणाले की, भारत सरकार काही लोकांना ब्रिटनमधून भारतात परत आणण्याचा प्रयत्न करत आहे पण, ब्रिटन न्यायालये भारतातील तुरुंगांमध्ये मानवी हक्कांचा आदर केला जातो की नाही याचा विचार करत आहेत. विजय मल्ल्याने भारतातून पळून जाणे आणि परत न येण्यावर प्रतिक्रिया दिली. मल्ल्या म्हणाले की तुम्ही मला फरार म्हणू शकता पण मला चोर म्हणू नका. त्यांना ‘चोर’ का म्हटले जात आहे, त्यांनी चोरी कुठे केली आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘मी पळून गेलो नाही, पण पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार भारताबाहेर गेलो.’पॉडकास्टमध्ये विजय मल्ल्या म्हणतात, “किंगफिशर एअरलाइन्सच्या अपयशाबद्दल मी सर्वांची माफी मागतो.” परिस्थिती दाखवल्यापेक्षा जास्त कठीण होती पण, संभाषणादरम्यान मल्ल्याने कोणताही गुन्हेगारी हेतू नाकारला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.