नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले, पहाटे कारची धडक; दोघांचा तो प्रवास शेवटचा ठरला, पती-पत्नीची कायमची ताटातूट.

कौटुंबिक कार्यक्रमासाठी परतूरला निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पतीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहेत. पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.कौटुंबिक कार्यक्रमासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला असून कर्त्या पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परतूरकडे जाण्यासाठी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. या भीषण अपघातामध्ये पतीचा मृत्यू झाला आहे. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना पडेगाव रस्त्यावरील हनुमान मंदिरासमोर गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी चालकाविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मकसूद मिर्झा बेग, वय ६५ वर्ष, असं अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर शमिना बेग या गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकसूद बेग हे कुटुंबासह कादंबरी दर्गा परिसरामध्ये राहतात. दरम्यान गुरुवार दिनांक ५ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास परतुर येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी बेग पती-पत्नीला जायचं होतं. परतूरला जाण्यासाठी दुचाकी रेल्वे स्थानकावर पार्किंगमध्ये उभी करून ते पुढे रेल्वेने जाणार होते.पती-पत्नी नियोजित वेळेनुसार घरातून निघाले. साडेपाच वाजेच्या सुमारास ते रेल्वे स्थानकाकडे जात असताना नगर नाका मार्गे रस्त्याने निघाले. पडेगाव रस्त्यावरील हनुमान मंदिरासमोर भरधाव एम.एच.२० इएल १५२२ या क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण धडकेत बेग दाम्पत्य रस्त्यावरुन दूरवर फेकले गेले.या अपघातामुळे मोठा आवाज झाला. आवाज ऐकून स्थानिक अपघातस्थळी पोहोचले. स्थानिकांनी तात्काळ दोघांना घाटी रुग्णाला दाखल केलं. मात्र या अपघातात मकसूद बेग यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये कारचालोकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली आहे. या भीषण अपघातानंतर बेग कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.