राफेलची निर्मिती आता भारतात; ‘टाटा’चा फ्रान्सच्या दस्सू एव्हिएशनशी करार, कुठे अन् कशाचे होणार उत्पादन?

भारतीय हवाई क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असलेल्या ‘टाटा अॅडव्हान्स सिस्टिम लिमिटेड’शी भागीदारी झाल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया ‘दसाँ एव्हीएशन’चे अध्यक्ष एरिक ट्रॅपियर यांनी व्यक्त केली.राफेल लढाऊ विमानांच्या सांगाड्यासह महत्त्वाच्या सामग्रीची निर्मिती आता भारतात होणार आहे. त्यासाठी फ्रान्सची विमाननिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य दसाँ एव्हीएशन कंपनी आणि टाटा अॅडव्हान्स सिस्टिम लिमिटेड (टीएएसएल) यांच्यात गुरुवारी करार झाला.

या करारानुसार ‘टीएएसएल’ हैदराबादमध्ये प्रकल्प उभारणार असून, २०२८पासून उत्पादन सुरू होईल.फ्रान्सच्या दसाँ एव्हीएशन कंपनीकडून भारत ११४ राफेल विमाने खरेदी करत असून, नौदलासाठी २६ राफेल खरेदीबाबत भारत-फ्रान्स यांच्यात नुकताच करार झाला. या पार्श्वभूमीवर भारतातच राफेल निर्मितीसाठी ‘टीएएसएएल’ आणि ‘दसाँ’ यांच्यात करार झाला आहे. हैदराबादमध्ये २०२८च्या आर्थिक वर्षात हा प्रकल्प सुरू होईल. त्यानंतर तिथे प्रत्येक महिन्याला दोन विमानांच्या सांगाड्यांची निर्मिती होणे अपेक्षित आहे, असे टीएएसएलने म्हटले आहे. राफेल विमानाच्या सांगाड्याचा पुढील भाग, मागील पूर्ण भाग आणि मधला भाग यांची बांधणी या प्रकल्पात होईल. त्यासाठी ‘दसाँ एव्हीएशन’शी उत्पादन हस्तांतरणाचे चार करार करण्यात आले आहेत. त्यामुळे देशाच्या हवाई क्षेत्रातील उत्पादन क्षमतेला आणि जागतिक पुरवठा साखळीला बळ मिळेल, असा विश्वास ‘टीएएसएल’ने व्यक्त केला.राफेल विमानांचा सांगाड्याची निर्मिती प्रथमच फ्रान्सबाहेर होणार आहे. पुरवठा साखळी बळकट करण्याच्या दृष्टीने हे निर्णायक पाऊल आहे. – एरिक ट्रॅपियर, अध्यक्ष, दस्सू एव्हिएशन भारताच्या हवाई क्षेत्राच्या प्रवासातील हे महत्त्वाचे पाऊल आहे. जागतिक पातळीवर ‘टीएएसएल ‘वरील विश्वासाचे हे प्रतीक आहे. – सुकरन सिंह, सीईओ, व्यवस्थापकीय संचालक, ‘टीएएसएल

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.