ज्वारीची सोंगणी करायला गेले येताना शेतकऱ्याचा घरी आला मृतदेह, शिवारात काय घडलं?

 बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील रुधाना येथे सुभाष अढाव नावाच्या एका शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना सर्पदंशामुळे मृत्यू झाला. ज्वारीची सोंगणी करत असताना ही दुर्दैवी घटना घडली.यावर्षी अवकाळी पाऊस हा तब्बल पंधरा दिवस आधीच संपूर्ण राज्यात दाखल झाल्यामुळे मुख्यतः सर्वसामान्य नागरिकांपेक्षा बळीराजाची जास्ती कसरत होत आहे. एकीकडे खरीप पिकाची तयारी केल्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा आपली काळी माती नव्याने तयार करण्याकरता कष्ट घेत असताना दुसरीकडे काही प्रमाणात शेतात असलेले पीक त्याला बाजारात आणण्याकरिता त्याला रात्री वेळ रात्री आपल्या शेतात जावं लागत आहे. मात्र तिथे एखादं संकट आहे हे मात्र त्याला घरून निघताना कळत नाही, असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या जीवावर बेतलाय.शेतात जाणं हे जणू काही एखाद्या फेरफटका मारण्यासारखं गावापासून शेतापर्यंत दररोज नित्यक्रम बळीराजा करत असतो.

जेव्हा एखादा पिक त्याच्या हातात असते तेव्हा तो एका उमेदीने जातो. अशाच उमेदीने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील रुधाना तालुक्यातील शेतकरी सुभाष दत्तात्रय अढाव (वय वर्ष 39) हे ३ जून रोजी आपल्या शेतात ज्वारी सोंगणी कामाकरता मग्न असताना अचानक पाठीमागून विषारी सापाने त्यांना दंश केला. काही कळायच्या आतच एकच खळबळ उडाली. या सर्व विवंचनेमध्ये त्यांच्या कुटुंबीयांना हे लक्षात येताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तात्काळ शेगाव येथील उपजिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा, व एक मुलगी असा परिवार आहे.या सर्व बाबी शेतामध्ये एखादं बिबट किंवा विषारी साप या सोबतच त्यांना सतत सावधता बाळगत काम करावं लागते. मात्र हंगामाच्या तोंडावरच हा सर्व प्रकार घडल्याने संपूर्ण गावकरी स्तब्ध होऊन वातावरण शोकाकुल झाले आहे. एक मनमिळाऊ गावकरी आपल्यातून अचानक पणे निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे.अनेक वेळा कृषी कार्यालयाकडून देखील प्रबोधनी केल्या जातात शेतात जात असताना नेमकं अशा काही घटना घडतात आणि या घटना उन्हाळ्याच्या उष्णते उष्णतेमुळे हे विषारी प्राणी व डोकं काढत असतात यापासून सावध करण्याचे अनेक बाबी वारंवार सांगितल्या जातात मात्र छोटीशी दुर्लक्ष आणि कायमस्वरूपी मोठी घटना घडून गेली .त्यामुळे या एका घटनेवरून सर्वांनी धडे घेणे गरजेचे आहे. सावता बाळगा आणि निसर्गाच्या संकटासोबत या प्रकारच्या येणारे देखील संकटापासून आपला बचाव करा याकरता आता खरीप हंगाम तोंडावर असताना बळीराजाला परीक्षाच आहे असे म्हणाला हरकत नाही.a

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.