मुलीची छेड काढण्यावरुन वाद, वडिलांवर दोघांचा हल्ला, कुटुंबीय पोहोचेपर्यंत सारं संपलेलं.

 पुण्यातील खेड येथे एका व्यक्तीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मुलीची छेड काढण्याच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे.मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाशी झालेल्या वादातून एका 40 वर्षीय व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील कडूस येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.संतोष बबन ढमाले (वय 40) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती आहे. मंगळवारी (3 जून) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही भयंकर घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

या प्रकरणी खेड पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे कडूस परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत मिळलेल्या अधिक माहितीनुसार, मृत संतोष बबन ढमाले आणि त्यांचा मित्र अशोक झांबर गारगोटे हे चेतन बारमधून दारू पिऊन बाहेर पडले होते. यावेळी बारसमोर उभे असताना आरोपी किरण शिवाजी खंडागळे आणि प्रणय प्रमोद नवले (दोघेही राहणार कडूस येथील) यांच्याशी संतोष यांचा वाद उफाळला.यापूर्वी प्रणय याने संतोष यांच्या मुलीची छेड काढली होती. त्यामुळे हा वाद अधिक तीव्र झाला. वादाचे पर्यवसन हिंसक हल्ल्यात झाले. दोन्ही आरोपींनी कोयत्याने संतोष यांच्या डोक्यावर आणि तोंडावर वार केले, यामध्ये संतोष ढमाले हे गंभीर जखमी झाले. जखमी झालेले संतोष ढमाले रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळले. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून अशोक झांबर घाबरले आणि तिथून पळून गेले. ते संतोष यांच्या घरी गेले. कुटुंबीयांना याची माहिती दिली आणि कुटुंबीयांना घेऊन ते घटनास्थळी परतले. तेव्हा कुटुंबीयांना संतोष हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. कुटुंबीयांनी संतोष यांना तातडीने चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.अशोक यांच्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी भा. द. वि. सं. 103(1), 3(5) आणि शस्त्र अधिनियम 4(25) अंतर्गत गु. नं. 325/2025 दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. या घटनेमुळे कडूस गावात तणाव निर्माण झाला असून, पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.