आणखी एक वैष्णवी! सासरच्यांचा जाच, पतीचीही साथ नाही; लग्नानंतर महिनाभरात महिलेनं आयुष्य संपवलं.

नागपुरात सासरच्यांच्या जाचाला कंटाळून एका नवविवाहितेने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. सासरच्यांकडून हुंड्यासाठी सतत छळ केला जात असल्याने या महिलेने टोकाचा निर्णय घेतला.नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरात सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका नवविवाहितेने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची अत्यंत वेदनादायक घटना उघडकीस आली आहे. मयुरी ठाकरे डाहुले (वय 26) या तरुणीने 30 मे रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तिचा विवाह अवघ्या 35 दिवसांपूर्वी म्हणजेच 25 एप्रिल 2025 रोजी अभिषेक डाहुले याच्याशी मोठ्या थाटामाटात पार पडला होता.मयुरीचा विवाह नागपूरच्या बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या अभिषेक डाहुलेशी झाला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचे भासवले गेले.

मात्र, काहीच दिवसांत सासरच्या मंडळींचा खरा चेहरा समोर आला. तिची सासू कुसुम डाहुले, सासरे दीपक डाहुले आणि दीर आदित्य डाहुले यांनी सतत पैशांसाठी मयुरीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. नवरा अभिषेक डाहुले यानेही या छळाला पाठिंबा दिल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.शारीरिक आणि मानसिक छळामुळे मयुरी अत्यंत तणावात होती. तिने सुरुवातीला आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती आपल्या वडिलांना दिली नव्हती, कारण तिला वाटले की काही दिवसांत परिस्थिती सुधारेल. मात्र, छळ न थांबल्यामुळे तिने आपल्या वडिलांना सर्व प्रकार सांगितला. वडिलांनी मदतीचा हात पुढे करत गटाच्या भीशीतील 20 हजार रुपये सासरच्या मंडळींना दिले, मात्र त्यानंतरही छळ थांबला नाही.अखेर या सहनशक्तीच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या छळाला कंटाळून मयुरीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मयुरीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अभिषेक डाहुले, सासू कुसुम डाहुले, सासरे दीपक डाहुले आणि दीर आदित्य डाहुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.ही घटना राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणारी ठरली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण अजूनही ताजं असताना नागपूरमध्येही अशीच एक धक्कादायक हुंडाबळीची घटना घडल्याने महिलांवरील अत्याचार आणि हुंडाबळी रोखण्यासाठी कठोर कायद्यांची मागणी नागरिकांनी जोरदारपणे केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.