बहावलपूरमधील ‘त्या’ 21 कबरी अन् कण्हणारा मसूद अझहर; ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा मोठा पुरावा समोर.

भारतीय सैन्यानं ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. बहावलपूरमध्ये २१ दहशतवाद्यांच्या कबरींचे फोटो समोर आले आहेत.इस्लामाबाद: भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर आता भारतीय सैन्याच्या यशाचे नवे पुरावे समोर आले आहेत. पाकिस्तानच्या बहावलपूरमधील २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो सोशल मीडियावर करण्यात आले आहेत. मारले गेलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असून त्यामध्ये जैशचा म्होरक्या मसूद अझहरच्या निकटवर्तीयांसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश आहे. यामुळे एअर स्ट्राईकच्या यशाचे आणखी पुरावे पाहायला मिळाले आहेत.ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पाकिस्तानमधील ४ आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ५ दहशतवादी तळ बेचिराख केले. जैश-ए-मोहम्मदचं बहावलपूरमधील मुख्यालय भारतीय सैन्याकडून लक्ष्य करण्यात आलं. या कारवाईत जैशचा म्होरक्या मसूद अझहरच्या कुटुंब आणि निकटवर्तीयांपैकी १४ जणांचा मृत्यू झाला.

त्यांची कबरी बहावलपूरमधील कब्रस्तानात पाहायला मिळत आहेत. यामुळे ऑपरेशन सिंदूरचं यश पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे.जैश-ए-मोहम्मदच्या ऑपरेटिव्हनं दहशतवाद्यांच्या कबरींचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मसूद अजहरच्या कुटुंबियांची कबरीदेखील पाहायला मिळत आहेत. व्हिडीओमध्ये मसूदचा आवाजदेखील ऐकू येत आहे. मसूद अझहर कण्हत असल्याचं आवाजावरुन स्पष्ट होत आहे. ऑपरेशन सिंदूरनं जैश-ए-मोहम्मद आणि संघटनेच्या नेतृत्त्वाला मोठा धक्का दिला. पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये कब्रस्तानात दफन करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यानं ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत झालेली कारवाई अतिशय अचूक होती, हे स्पष्ट झालं आहे. भारतीय सैन्याच्या एअर स्ट्राईकनं दहशतवाद्यांच्या नेटवर्कला मोठा हादरा दिला आहे.२२ एप्रिलला जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. बेछूट गोळीबारात २६ निष्पाप नागरिक मारले गेले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं ६ आणि ७ मेच्या रात्री पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले चढवले. एकूण ९ दहशतवादी तळ एअर स्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त करण्यात आले. भारताची ही कारवाई ऐतिहासिक ठरली. अण्वस्त्र संपन्न देशात याआधी कोणत्याही देशानं अशा प्रकारे एअर स्ट्राईक केलेले नाहीत. पण ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत भारतानं धाडसी कारवाई केली. भारतानं दहशतवादी तळांवर अचूक हल्ले चढवले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.