शिवभक्तांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय: राज्याभिषेक दिनी मुंबई-गोवा हायवेवर ‘या’ वाहनांना बंदी!

रायगडमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर 5 जून रोजी सायंकाळी 4:00 ते 6 जून 2025 रोजी रात्री 10:00 पर्यंत जड वाहनांना बंदी असणार आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.रायगड: मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 5 जून रोजी सायंकाळी 4:00 ते 6 जून 2025 रोजी रात्री 10:00 पर्यंत जड आणि अवजड वाहनांना बंदी असणार आहे. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा निर्णय घेतला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि शिवभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.किल्ले रायगडावर 5 आणि 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई यासह राज्यभरातून अनेक ठिकाणांहून लाखो शिवभक्त येणार आहेत. रायगडावर जाण्यासाठी माणगांव-निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला आणि महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला हे तीन मार्ग आहेत.

या मार्गांवरून शिवभक्त मोठ्या संख्येने प्रवास करतात. शासकीय वाहनांचीही मोठी गर्दी असते. मुंबई-गोवा महामार्गावरून कशेडी घाट ते महाड आणि वाकणफाटा-नागोठणे-कोलाड-माणगांव-महाड मार्गे ही वाहने येणार आहेत. याच मार्गावरून जड आणि अवजड वाहनांचीही खूप वाहतूक असते. त्यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. या कार्यक्रमात वाहतूक कोंडी होऊ नये आणि शिवभक्तांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी जावळे यांनी जड व अवजड वाहतूक बंदीचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले, “श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.”काही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू नाही. दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला आणि रुग्णवाहिका यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या गाड्या नेहमीप्रमाणे सुरू राहतील. जिल्हाधिकारी जावळे यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.या संदर्भात जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, वाकणफाटा नागोठणे ते कशेडीपर्यंत आणि माणगांव-निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गांवर जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंद असेल. त्यामुळे, जर तुम्ही या काळात मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत असाल, तर जड आणि अवजड वाहनांनी या वेळेत प्रवास करणे टाळावे, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.