जळगाव हादरलं! खासगी ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक, भीषण अपघातात दोनजण दगावले, २० जखमी, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु.

 राज्यात खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघात झाला. यात दोन प्रवासी जागीच ठार झाले, तर 15 ते 20 जण जखमी झाले. दोन दिवसांपूर्वी जामनेर तालुक्यातील पहूरजवळही असाच एक अपघात झाला होता. आज सकाळी जळगावहून अकोल्याकडे जाणारी एक ट्रॅव्हल्स बस ट्रकवर आदळली. हा अपघात मुक्ताईनगरजवळ झाला. अपघातामध्ये ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा चुराडा झाला. दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. 15 ते 20 प्रवासी जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अपघातग्रस्त गाड्या हटवण्याचे काम सुरू आहे.

त्यामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात शोक पसरला आहे. अपघाताचे कारण अजून समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. “अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही,” असे पोलिसांनी सांगितले. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत.

जिल्ह्यात वाढत चाललेल्या अपघातांचे प्रमाण अतिशय चिंताजनक होत आहे. चालकाच्या भरवशावर प्रवासी निवांत असतात की, आम्ही आमच्या इच्छित ठिकाणी सुरक्षित पोहोचू. परंतु रस्ता मोकळा दिसल्यावर चालक इतर कशाचीही पर्वा न करता जलद पोहोचण्यासाठी वाहनाचा वेग वाढवतात आणि अघटित होऊन बसते.दोन दिवसांपूर्वी जामनेर तालुक्यातील पहूरजवळ ‘संगीतम’ खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला होता. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. अशा अपघातांमुळे ट्रॅव्हल कंपन्यांनी चालकाची निवड करतेवेळी काही बंधनं घालून देणं आवश्यक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.