आरसीबीच्या विजयानंतर अनुष्का शर्माने शेअर पहिल्यांदाच शेअर केला विराट कोहलीचा व्हिडिओ.

‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ने 03 जून 2025 रोजी अहमदाबादच्या स्टेडियममध्ये इतिहास घडवला! इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामात IPL 2025 ची ट्रॉफी विराट कोहलीच्या टीमने उचलली. अहमदाबादमधील जल्लोषानंतर आता बंगळुरुमध्ये सेलिब्रेशन होणार असून, आता रजत पाटीदारने नेतृत्व केलेली ही टीम त्यांच्या फ्रँचायझीच्या शहरात दाखल झाली आहे. त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा बंगळुरुकरांची गर्दी झाली होती. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने हे क्षण कॅमेऱ्यात टिपले आणि व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विराटने त्याच्या हातात ट्रॉफी पकडली आहे अन् समोर बंगळुरुची जनता संपूर्ण संघाचे स्वागत करताना दिसले.

अनुष्काने विराटचा व्हिडिओ शेअर करत असे लिहिले की, ‘नम्मा बेंगलुरू’ म्हणजेच ‘आमचे बंगळुरू’. अभिनेत्रीने हात जोडण्याचा इमोजी वापरुन असेही म्हटले की, ‘सध्याचे दृश्य’. अनुष्काने 4 जून रोजी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसतेय की विराटने अगदी लहान बाळाप्रमाणे त्याची पहिलीवहिली आयपीएल ट्रॉफी हातात पकडली आहे.संघाच्या स्वागतासाठी एवढी गर्दी झाली आहे की, पोलिसांच्या संरक्षणात त्यांची गाडी पुढे सरकते आहे. शिवाय गर्दीतून वाट काढण्यासाठीदेखील पोलिसांची मदत घ्यावी लागते आहे.तसेच बंगळुरुमध्ये आयोजित करण्यात आलेली ओपन बस विजयी यात्रा रद्द करण्यात आले आहे. मर्यादित पार्किंगमुळे हा निर्णय घेण्यात आला असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपूर्ण संघाचा सत्कार केला जाणार आहे.दरम्यान सामना शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर विराटला अश्रू अनावर झाले आणि तो मैदानातच कोसळला.

3 जून रोजी RCB ने पंजाबविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर त्याचे डोळे अनुष्कालाच शोधत होते. अनुष्कानेही उड्या मारुन आनंद साजरा केला, त्यानंतर नवऱ्याचे 18 वर्षांचे स्वप्न पूर्ण झालेले पाहून तिचेही डोळे पाणावले. विराटने अनुष्काला मिठी मारुन खास सेलिब्रेशन केले. त्याक्षणी दोघेही खूप भावुक झाले होते. सोशल मीडियावर विरुष्काचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले आहेत. शिवाय पोस्ट मॅचदरम्यान दिलेल्या मुलाखतींमध्येही त्याने त्याच्या यशाचे श्रेय त्याचे कुटुंबीय, प्रशिक्षक आणि प्रामुख्याने अनुष्काला दिले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.