सुरेश धसांनी नवा बॉम्ब टाकला; हगवणेंचे नातेवाईक IPS जालिंदर सुपेकरांबद्दल मोठा गौप्यस्फोट.

पुणे: पैशासाठी सुनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांमुळे वादात सापडलेल्या पुण्यातील हगवणे कुटुंबाचे नातेवाईक असलेले आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर हेदेखील अडचणीत आले आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी सुपेकर यांच्यावर हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देण्यासाठी मदत केल्याचा आरोप होता. तसेच वैष्णवी हगवणे यांच्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली करण्यात आली होती. आता धस यांच्या आरोपांमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आमदार सुरेश धस यांनी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “आयजी पोस्टवर असलेला माणूस 1 लाख रुपये रोख घेतो आणि 50 हजाराचा मोबाईल घेतो यापेक्षा दुर्दैव काय असावे?”, असे धस म्हणाले. सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून ३०० कोटी रुपये मागितल्याचा आरोपही त्यांनी केला. “जेलमध्ये सुपेकर यांनी कैद्यांना 300 कोटी रुपये द्या, असं म्हटल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे,” असं धस म्हणाले.”नातेवाईकाच्या सुनेकडून पैसे मागता, याचा अर्थ सुपेकर हा माणूस 100 टक्के फॉल्टी आहे. नैतिकता नावाची गोष्ट राहिलेली नाही.

गोष्ट किती खालच्या थराला गेल्यात याचं हे उदाहरण आहे,” असेही धस म्हणाले.हगवणे कुटुंबावरही सुरेश धस यांनी टीका केली. हगवणे कुटुंबाची 150 कोटींची मालमत्ता आहे. “ही प्रॉपर्टी आता जाळायची की पेटवायची. असे लोक तुरुंगातून किती वर्षांनीही बाहेर आले तरी त्यांच्यावर शेण फेकलं पाहिजे,” असं धस म्हणाले.दरम्यान, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यांची विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावरून उप महासमादेशक होमगार्ड या पदावर बदली करण्यात आली होती.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.