लग्न आटपून घराकडे निघालेल्या वऱ्हाडाचा भीषण अपघात, ट्रेलरला धडकून मारुती व्हॅन चक्काचूर, ९ जण दगावले.

रतलाम- झाबुआ राज्य महामार्गावरील संजेली रेल्वे क्रॉसिंगजवळ झालेल्या अपघातात ९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सिमेंटने भरलेला टँकर ट्रेलर, मारुती इको व्हॅनवर उलटल्याने हा अपघात झाला. व्हॅनमध्ये ११ जण होते. ही घटना काल(३ जून) रात्री उशिरा घडली. मृतांमध्ये शिवगड, देवीगड आणि मोवाडा गावातील रहिवासी होते.सांजेली रेल्वे क्रॉसिंगवर बांधण्यात येत असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ हा अपघात झाला. एका वेगाने येणाऱ्या ट्रेलरचे नियंत्रण सुटले आणि तो मारुती इको व्हॅनवर उलटला. व्हॅनमधील ११ जणांपैकी ९ जणांचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित दोघे गंभीर जखमी झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणपुरा पोलीस स्टेशन परिसरातील मानपुरा गावात एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी सर्व लोक गेले होते.

तेथून ते मारुती इको व्हॅनने परतत होते. त्यानंतर साजेली गेटजवळ बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ इको व्हॅन ट्रॉलीला धडकली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी झाले. इको व्हॅनमध्ये एकूण ११ जण प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला आहे. मृतांचे मृतदेह मेघनगर आणि थंडला रुग्णालयात नेण्यात आले आहेत. त्यांचे शवविच्छेदन तेथेच केले जाईल. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

अपघाताचे कारण काय होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.दुसरीकडे, महाराष्ट्रात जळगावमध्ये मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात दोन प्रवासी जागीच ठार झाले, तर 15 ते 20 जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अपघातग्रस्त गाड्या हटवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.