सुधाकर बडगुजर यांची ठाकरेसेनेतून हकालपट्टी, भर पत्रकार परिषदेत संजय राऊतांचा फोन, नेमकं काय घडलं?

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. मागील दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील राजकारणामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणून चर्चेत असणारे शिवसेनेचे उपनेते आणि माजी जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्या वेळेपासून ते पक्ष सोडणार अशा स्वरूपाच्या चर्चा होतात.पत्रकार परिषद सुरू असताना सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या मोबाईल वरती मुंबईवरून खासदार संजय राऊत यांनी फोन करून पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती दिली आणि त्याची घोषणा यावेळी करण्यात आली आहे.

यासंदर्भामध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी म्हणून शिवसेना कार्यालयात जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगर प्रमुख विलास शिंदे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, नेते सुनील बागुल, माजी महापौर विनायक पांडे, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती .यावरून खासदार संजय राऊत यांनी बोलताना संशयास्पद वातावरण होईल अशा भेटी टाळायच्या असतात. बडगुजर हे नाशिकची शिवसेना नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. बडगुजर यांनी कारवाई झाल्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हकालपट्टीचा निर्णय हा एकतर्फी घेतल्याचं ते म्हणालेत.पक्षात नाराजी व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही. पक्षाने जी कारवाी केली आहे, त्याला मी योग्यवेळी उत्तर देतील. मी आज नाशिकबाहेर पूर्वनियोजित दौरा असल्याने मला पक्षाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलो नाही. मी आता यावर काही बोलणार नाही, वेळ आली की सांगेल. पक्षामध्ये झालेल्या बदलांबदल मी नाराजी व्यक्त केलेली होती. पक्षप्रमुखांनी संधी दिली असती तर भेटलो असतो पण हकालपट्टी केल्याने आता काही भेटायचा प्रश्न उरलेला नाही. जाहीरपणे मत व्यक्त करणं हा गुन्हा नाही. पक्षात जे नाराज नेते होते ते वेळोवेळी नाराज आहेत. मी त्यांची नावे जाहीर करणार नाही. हकालपट्टीचा निर्णय हा एकतर्फी असल्याचं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.