आमचे घर आम्हाला परत द्या अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू, पीडित परिवार.

आमचे घर आम्हाला परत द्या अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू, पीडित परिवार.आम्ही राहत असलेल्या जागेवर विनोद पंढरीनाथ पाटील या व्यक्तीने अनधिकृतपणे बांधकाम केले असल्याने त्यास जागा खाली करण्यास सांगायला गेले असता तो रु. २,००,०००/- मागणी करीत असून पैसे न दिल्यास जागा मिळणार नाही अशी धमकी देत असल्याने मला न्याय मिळणेबाबत.आम्ही आदिवासी भिल्ल समाजातील असून मागील ३० ते ३५ वर्षापासून हरी विठ्ठल नगर परिसरातील, वार्ड डी-८ मधील घर क्र. १६५१ वर रहात आहे. तसेच सदरील जागेची घरपट्टी देखील आम्ही भरत आहोत. याशिवाय सदरील जागेचे म.न.पा.चे नळ कनेक्शन देखील असून या जागेवर वीज कनेक्शन सुध्दा माझे नावे घेतलेले आहे.

तसेच मी व माझी पत्नी हे वयोवृध्द असल्याने आमचा सांभाळ माझी भावाची मुलगी नामे. लक्ष्मी भगवान मोरे हीच करीत आहे.असे असतांना गेल्या काही वर्षापासून विनोद पंढरीनाथ पाटील व त्याचे कुटुंब याने आमच्या राहत्या जागेवर पार्टीशन चे घर जोर जबरदस्तीने स्वतःचे पक्के बांधकाम करुन घेतलेले आहे. तरी याबाबत आम्ही ३ ते ४ वेळेस म.न.पा. कडे अर्ज देऊन सुध्दा संबधितावर काहीएक कारवाई होत नाही. तसेच त्याने आमचे जागेवर पक्के बांधकाम करुन तो त्याचे कुटुंबासह आज रोजी आमच्या जागेवर बांधलेल्या अनधिकृत घरात रहात आहे.तसेच सदरील इसमास मी व माझ्या भावाच्या मुलीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता जातीला लज्जास्पद निर्माण होईल अशा घाणेरड्या भाषेत तिला शिवीगाळ करुन तिच्यासमोर कपडे वगैरे काढून घाणेरडे बोलतो.

त्यातच त्याची पत्नी सौ. हेमांगी (राणी) विनोद पाटील त्याची भावाची पत्नी सौ. सुनीता विकास पाटील, तसेच त्याची आई नामे. गंगुबाई पंढरीनाथ पाटील या माझ्या घरात घुसून माझ्या भावाच्या मुलीस घाणेरड्या शिवीगाळ व मारहाण करतात व सांगतात की तुमच्याकडून संपूर्ण जागाच खाली केल्याशिवाय राहणार नाही. तु येथून कसे काय जात नाही आता बघच ?याउपर तुम्हांला जर तुमची जागाच हवी असेल तर मला रु.२,००,०००/- दिले तरच जागा खाली करुन देऊ नाहीतर तुझ्याकडून जे होईल ते करुन घे, अशा धमक्या देत आहे. तसेच तु अथवा त तुझी भावाची मुलगी पोलीसात अथवा कुठेही गेले तरी माझे कुणीच काही वाकडे करणार नाही. माझे वरपर्यंत सर्व अधिकाऱ्यांशी हात पोहोचलेले आहे.तरी महोदय साहेबांना माझी कळकळीची विनंती की, संबंधित व्यक्तीने माझे जागेवरील केलेला अनधिकृत ताबा सोडण्यास व आमचे जागेवर केलेले अनाधिकृत बांधकाम पाडण्याची समज द्यावी व मला न्याय मिळवून द्यावा.महोदय साहेब मला १० दिवसांचे आत न्याय न मिळाल्यास मी मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझी वृध्द पत्नी व आमचे पालन पोषण आणि सांभाळ करणारी माझी भावाची मुलगी असे सर्वजण उपोषणाचा मार्ग अवलंबविणार आहोत याची कृपया दखल घ्यावी ही विनंती.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.