मोठी बातमी: शरद पवारांच्या पक्षाची रात्री उशिरा खलबतं; विलीनीकरणाबाबत नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा मेसेज.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला तूर्तास ब्रेक लागला आहे. करण शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत वरिष्ठ नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून १० जून रोजी होणारा वर्धानपन दिनाचा कार्यक्रम आपण स्वतंत्ररीत्याच करणार असल्याचं नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अजित पवारांच्या पक्षाने पुण्यात वर्धापन दिनाचा कार्यक्रम घेण्याचे निश्चित केलेले असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही वर्धापन दिन पुण्यात होणार आहे. दोन्ही गटांचे कार्यक्रम एकाच शहरात होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शरद पवारांची राष्ट्रवादी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन पुण्यात एका मोठ्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे आमदार, खासदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने शरद पवारांचा पक्ष आपली ताकद दाखवणार आहे.

या मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. त्यामुळे या वर्धापन दिनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृह इथे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बालेवाडी स्टेडियम इथं वर्धापन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.ऊस लागवडीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या संदर्भात शरद पवार आणि अजित पवार एका बैठकीत काही दिवसांपूर्वी पुन्हा एकत्र आले होते. साखर संकुल येथे ही बैठक झाली. या बैठकीत काका-पुतण्यांमध्ये हास्यविनोद बघायला मिळाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार, या चर्चेला पुन्हा हवा मिळाली होती.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर काका-पुतणे अनेक वेळा एकाच व्यासपीठावर आले आहेत. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेसाठी आणि व्यवस्थापन बैठकीसाठीही दोघे एकत्र आले होते. याआधी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीतही दोघांचा संवाद झाला होता.

अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुडा कार्यक्रमात पवार कुटुंब एकत्र आले होते. त्यानंतर दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र येणार का, अशी चर्चा सुरू झाली.या संदर्भात शरद पवार म्हणाले होते, “याबाबत सुप्रिया आणि अजित याबाबतचा निर्णय घेतील.” त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, याबाबत विचारले असता, “कल्पना नाही,” असे म्हणून त्यांनी विषय टाळला. अजित पवार यांनीही “अशी कोणतीही चर्चा नाही,” असे स्पष्ट केले. पत्रकारांनी अजित पवार यांना याबाबत प्रश्न विचारला, तेव्हा ते काही न बोलता निघून गेले होते.दरम्यान, या सगळ्या घटनांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे वर्धापन दिन साजरा करण्याचे निश्चित केल्याने राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाच्या चर्चांना सध्या तरी ब्रेक लागला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.