मुलाचा आयटीआयचा प्रवेश घेतला, घरी येताना निवृत्त वनाधिकाऱ्यासोबत नको ते घडलं.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मुलाचा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून दुचाकीने माघारी परतताना दोन दुचाकींचा समोरासमोर घेऊन अपघात झाला. या अपघातात मुलाचा प्रवेश घेऊन परतणाऱ्या पित्याचा मृत्यू झाला. तर मुलगा व अन्य एक व्यक्ती यात गंभीर जखमी झाला आहे. ही घटना खुलताबाद येथील आयटीआय समोर दुपारी तीन वाजता सुमारास घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मुलाचा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून दुचाकीने माघारी परतताना दोन दुचाकींचा समोरासमोर घेऊन अपघात झाला. या अपघातात मुलाचा प्रवेश घेऊन परतणाऱ्या पित्याचा मृत्यू झाला. तर मुलगा व अन्य एक व्यक्ती यात गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना खुलताबाद येथील आयटीआय समोर दुपारी तीन वाजता सुमारास घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.शिवाजी हिम्मतराव बारगळ वय 59 राहणार खुलताबाद असं मयत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी बारगळ हे खुलताबाद शहरातील मोठी अळी परिसरामध्ये कुटुंबीयांसह राहतात. ते मागच्या वर्षी वनविभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान त्यांच्या मुलाला औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये प्रवेश घ्यायचा होता. यासाठी घरातील काम आटपत शिवाजी बारगळ हे मुलाला घेऊन संस्थेत गेले.मुलाच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर ते मुलाला घेऊन घराकडे परत असताना महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच भरधावी येणाऱ्या एम.एच.४८ सी.डबलू ७७८२ या क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिली.

या भीषण अपघातामध्ये शिवाजी बारगळ यांचा जागी स्मृत झाला. त्यांचा मुलगा गोकुळ शिवाजी बारगड हा गंभीर जखमी झाला आहे.तर धडक देणाऱ्या दुचाकी वरील करून देखील गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळतच नातेवाईकांनी टाहो फोडला. तर गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, वनविभागामधून सेवानिवृत्त झालेल्या शिवाजी बारगळ यांना वर्षेभरातच मृत्यूने गाठले. मुलाच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी गेलेल्या बारगळ यांना पुसटशीसुद्धा कल्पना नव्हती नियती त्यांचा असा घात करेल.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.