युवा नृत्य दिग्दर्शकाचं हार्ट अटॅकने निधन, मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा, मृत्यूआधीच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष.

युवा नृत्य दिग्दर्शकाचं हार्ट अटॅकने निधन, मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा, मृत्यूआधीच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष मुंबईकर युवा नृत्य दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. ओंकार मुळाजकर असे मयत तरुणाचे नाव आहे. ऐन तारुण्यात ओंकारला मृत्यूने गाठल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ओंकारच्या अकस्मात निधनामुळे मुळाजकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्र परिवारालाही मोठा धक्का बसला आहे. ओंकारने मृत्यूच्या काही तास आधीच सोशल मीडियावर स्टोरीही शेअर केली होती.

प्रख्यात लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते चंद्रशेखर सांडवे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित ओंकार मुळाजकर याच्या मृत्यूची बातमी दिली आहे. चंद्रशेखर सांडवे हे सांस्कृतिक कलादर्पणचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जातात. गेल्या काही दिवसात युवा कलाकारांची हार्ट अटॅकने होणारी अखेर चिंतेचा विषय ठरत आहे.ओंकार मुळाजकर हा युवा नृत्य दिग्दर्शक म्हणून मनोरंजन विश्वात लोकप्रिय होता. सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार सोहळ्यासाठी तो गेली अनेक वर्ष सहाय्यक नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करत होता. ओमी म्हणून तो मराठी इंडस्ट्री आणि मित्रांमध्ये प्रसिद्ध होता.”सांस्कृतिक कलादर्पणच्या पुरस्कार सोहळ्यासाठी गेली अनेक वर्षे सहाय्यक नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करणारा कै. नृत्य दिग्दर्शक ओंकार मुळाजकर ( ओमी) याचे आत्ताच हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ईश्वर त्याच्या पवित्र आत्म्याला चिरशांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली” अशा भावना चंद्रशेखर सांडवे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे ओंकार मुळाजकर यांची प्राणज्योत मालवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ओंकारच्या अचानक जाण्यामुळे मुळाजकर कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. ओमीच्या मित्र परिवारालाही मोठा हादरा बसला आहे.धक्कादायक म्हणजे मृत्यूच्या काही तास आधीच त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरीही शेअर केली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त कल्याण येथे आयोजित कार्यक्रमाचे वृत्त देणाऱ्या वर्तमानपत्रांचे फोटो त्याने स्टोरीमध्ये शेअर केले होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.