श्वानदंश म्हणजे कुत्र्याने चावा घेण्याच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. आपण पाळीव कुत्र्यांनी एखाद्याचा चावा केल्याच्या घटनांबद्दल बोलायचे तर अशा परिस्थितीत, पीडित व्यक्तीसमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याने यासाठी कोणाला जबाबदार धरावे? दोषी आढळल्यास कोणत्या प्रकारची कारवाई होऊ शकते? यावरील एक विशेष रिपोर्ट पाहूयाआमच्या सोसायटीमध्ये एका सभासदाने त्याच्या फ्लॅटमध्ये दोन कुत्रे पाळले आहेत, जे सारखे भुंकत असतात, सभासदांच्या अंगावर येतात. सभासदांना त्यांची खूप भीती वाटते. या श्वानांची स्वच्छताही राखली जात नाही. काही सांगायला गेल्यास सतत ‘पेटा कायद्याची धमकी देतात. सोसायटीचे पदाधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. या त्रासाबाबत आम्ही काय करावे?कुत्री, मांजरी पाळण्यास कायद्याने बंदी नाही आणि कित्येक जण योग्य ती काळजी घेऊन पाळतात देखील. परंतु काही सभासद नीट काळजी घेत नाहीत. कुठलेही प्राणिप्रेम हे कायद्यापेक्षा मोठे होऊ शकत नाही आणि पेटा कायदा देखील याला अपवाद नाही.











