गुणवंत गौरवाचा सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न.

भडगाव ( प्रतिनिधी )– गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही भडगाव शहरात शिवसेना – युवासेना आणि स्व. बापुजी युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच फाउंडेशनचे संस्थापक लखीचंद पाटील यांच्या संकल्पनेतून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व करिअर मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमात भडगाव शहर व परिसरातील इयत्ता १० वी व १२ वीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आमदार किशोर अप्पा पाटील व प्रा.विठ्ठल कांगणे सर यांच्या हस्ते भेट देऊन त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्राला वक्तृत्वकौशल्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रा. विठ्ठल कांगणे सर यांचे करिअर मार्गदर्शन सत्र. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक शिक्षण, उच्च शिक्षण व व्यवसायाच्या संधी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या प्रभावी शैलीत दिलेले मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले.या सोहळ्याला पालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन सुयोजित पद्धतीने करण्यात आले होते. लखीचंद पाटील यांच्या सामाजिक भानातून व युवा पिढीबद्दल असलेल्या जबाबदारीतून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.