मी दारू आणलीय अन् तू पितोय काय?; बापलेकात वाद झाला अन् जन्मदात्यानेच मुलाचा जीव घेतला!

वरूड तालुक्यातील बहादा येथे धक्कादायक घटना घडली. हिरामण धुर्वे याने मुलगा दिलीप धुर्वेला दारूच्या नशेत मारले. दिलीपने वडिलांसाठी आणलेली दारू प्यायल्याने हिरामणला राग आला. रागाच्या भरात हिरामणने मुलाच्या डोक्यात काठी मारली. यात दिलीपचा मृत्यू झाला.अमरावती: वरूड तालुक्यातील बहादा येथे एक धक्कादायक घटना घडली. एका बापाने आपल्याच मुलाला दारूच्या नशेत मारले. मुलगा दिलीप धुर्वे (वय ३५) याने वडिलांसाठी आणलेली दारू प्यायली. त्यामुळे वडील हिरामण धुर्वे (वय ६५) यांनी रागाच्या भरात मुलाच्या डोक्यात काठी मारली. यात दिलीपचा मृत्यू झाला.

ही घटना सोमवार सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, दिलीपचे वडील हिरामण यांनी दारू आणली होती. मात्र दिलीपने ती दारू पिऊन टाकली. हे कळताच हिरामणला प्रचंड राग आला आणि दोघांमध्ये वाद झाला. वादावादीत हिरामणने काठीने दिलीपच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्यामुळे दिलीप जागीच ठार झाला.पोलिसांनी हिरामणला अटक केली असून “स्वतःसाठी आणलेली दारू तरूण मुलगा प्यायल्याने संतापलेल्या बापाने मुलाच्या डोक्यावर काठीने प्रहार करून त्याला संपवले,” असे पोलिसांनी सांगितले.मृत दिलीप विवाहित होता. त्याला पाच वर्षांची मुलगी आणि अडीच वर्षांचा मुलगा आहे. ते सर्व एकत्र राहत होते. दिलीप कोणताही कामधंदा करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे घरात नेहमी वाद होत असत. सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दिलीप दारूच्या नशेत होता. त्याचवेळी बापलेकांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादाचे रूपांतर खुनात झाले, असं शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती देताना सांगितलं आहे.दरम्यान, वरूडचे ठाणेदार अर्जुन ठोसरे आणि उपनिरीक्षक दीपक दळवी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. “या प्रकरणी आरोपी पिता हिरामण जितुजी धुर्वे (वय ६५, रा. बहादा) याला अटक केली आहे,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.