ट्रक चालकाला फिट अन् पोलीस भरतीच्या स्वप्नांचा चुराडा, दोघी मैत्रिणींना चिरडलं, कुटुंबावर शोककळा.

 ट्रक चालकाला फिट अन् पोलीस भरतीच्या स्वप्नांचा चुराडा, दोघी मैत्रिणींना चिरडलं, कुटुंबावर शोककळा पोलिस भरतीच्या तयारीसाठी एका खासगी अभ्यासिकेत अभ्यास करून घरी जात असलेल्या विद्यार्थिनींना ट्रकने चिरडले. यात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरी जखमी आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील तुकुम परिसरात सोमवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. सानिका कुमरे, वय 22 वर्ष, रा. लक्कडकोट, असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ट्रक चालकाला फिट आल्याने हा अपघात झाल्याची माहिती.सोमवारी सायंकाळी तुकूम परिसरातून ट्रक जात असताना चालकाला फिट आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनाने रस्त्यालगत उभ्या असलेल्या नागरिकांना आणि ऑटोला चिरडले. या घटनेत सानिकाचा जागीच मृत्यू झाला, तर काजल आत्राम, रा. उपरवाही, ता. राजुरा आणि नंदा उंबरकर, वय 55 वर्ष, रा. मेजर गेट या जखमी झाल्या आहेत. काजलला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मृतक आणि जखमी या दोघी मैत्रिणी असून त्या पोलिस भरतीच्या तयारीकरिता चंद्रपुरात राहत होत्या. त्या एका खासगी अभ्यासिकेतून घरी जात असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांनी घटनास्थळी भेट दिली.दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यात गारखेडा, ता. जामनेर, गावाजवळ भुसावळहून पुण्याकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्सची प्रवासी बस उलटल्याने अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना रविवारी दिनांक एक जून रात्री 9 ते 9.30 वाजेच्या सुमारास घडली. यात 8 ते 10 प्रवासी जखमी असून, जखमींमध्ये तीन-चार बालकांचाही समावेश आहे.अपघात होताच बसचालक तिथून पसार झाला. जामनेर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून, ट्रॅव्हल्सच्या बस चालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने रस्त्याच्या कामात योग्य सुरक्षा उपाययोजना न केल्याबद्दल संबंधित विभागाच्या चौकशीचे संकेत दिले आहेतया अपघातातील जखमी बेबाबाई घाडे (वय 75), साहील घाडे (वय 8, दोन्ही रा. खिरोदा), ललिता इंगळे (वय 40), दिशा इंगळे (वय 8, दोन्ही रा. बऱ्हाणपूर), योगेश चौधरी (वय 34) आणि रणजित राजपूत (वय 30, दोन्ही रा. भुसावळ) यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.डॉ. प्रवीण पाटील व परिचारिकांनी जखमींवर उपचार केले. या बसमधील अन्य 7 ते 8 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, अन्य प्रवाशांनी भुसावळ येथे परत जात असल्याचे सांगितल्याने रुग्णवाहिकेतून भुसावळात पोहचवण्यात आले. गारखेडा परिसरात सध्या रस्त्याचे चौपदरीकरण व दुभाजकाचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्त्याचा काही भाग खडखडीत झाला असून, मार्ग व्यवस्थित चिन्हांकित नाही. अशा स्थितीत वेगात असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.