महाराष्ट्राला यंदा पाऊस झोडपणार; सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात कोसळणार? असा आहे हवामान अंदाज.

ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार, यंदा राज्यात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडणार आहे, पश्चिम महाराष्ट्रात अधिक शक्यता आहे. मात्र, जून-जुलैमध्ये काही ठिकाणी पावसाचा खंड राहील. हवामान बदलामुळे पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांनी पीक पेरणीत बदल करण्याची सूचना त्यांनी दिली आहे.महाराष्ट्रात यंदा मान्सूनपूर्व पावसाने विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. अनेक जिल्ह्यांतमे महिन्यातील विक्रमी पाऊस कोसळला आहे. अशातच राज्यात यंदा धुव्वाधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात यंदा सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत वर्तविला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पुणे विभागात सरासरीच्या ११५ टक्के पडण्याचा अंदाज असल्याचे ते म्हणाले.


‘जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील. जून, जुलै महिन्यात धुळे, राहुरी, परभणी, निफाड, अकोला पाडेगाव आणि कोल्हापूर येथे पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. दापोली, पुणे, नागपूर, सोलापूर, जळगाव, धुळे व कराड येथे खंडाचा कालावधी कमी राहणार आहे,’ असे डॉ. साबळे यांनी सांगितले.‘प्रमाणापेक्षा जास्त पाऊस होत असल्याने पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. हवामान बदलामुळे खंडात्मक पर्जन्यमानात मोठे बदल झाले आहेत. काही ठिकाणी जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस, असा मान्सून असल्याने शेतकऱ्यांनी पीक पेरणी पद्धतीत बदल करावा,’ असे डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितलं आहे.मुंबई आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर, आज समुद्राला मोठी भरती येणार आहे. आज दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहील. त्यामुळे, शहरात आणि उपनगरात कधीही हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.