खबरदार! शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर…, कृषी केंद्रांना जिल्हा प्रशासनाचा कडक इशारा.

शेतकऱ्यांची जर फसवणूक करतील तर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांचे परवाने रद्द करून संबंधित दुकान कायमचे बंद करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिला आहे. दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी वणवण फिरावे लागते. बरेचदा नकली बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते. बनावट खते व कीटकनाशके शेतकऱ्यांना विकली जातात. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कृषी व्यावसायिक यापुढे शेतकऱ्यांची जर फसवणूक करतील तर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांचे परवाने रद्द करून संबंधित दुकान कायमचे बंद करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिला आहे. विशेष म्हणजे ‘मटा’ने रविवारी ‘शेतकऱ्यांची बियाण्यांसाठी भटकंती’ असे वृत्त प्रकाशित केले होते.खरीप हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात बियाणे व खते खरेदी करण्याकरिता शहरात गर्दी करतात. त्यावेळी कृषी साहित्य विकणारे दुकानदार शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा भावात बियाणे विकतात किंवा एखाद्या बियाण्यांच्या वाणासोबत दुसरे बियाणे घ्यायला भाग पाडतात. काही ठिकाणी बनावट बियाणे सुद्धा शेतकऱ्यांना दिले जाते.

कालबाह्य खते शेतकऱ्यांना विकली जातात. यापुढे असा कुठलाही शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रयत्न जर कृषी केंद्र संचालकांकडून होत असेल तर त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांचे परवाने रद्द केले जातील. संबंधित दुकान कायमचे बंद करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.खरीप हंगाम जवळ येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांची बियाण्यांसाठीची धावपळ व ठराविक बियाण्यांच्या वाणाला असणारी मागणी लक्षात घेता दुकानदार या संधीचा फायदा घेत शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. यापुढे अशा फसवणूक करणाऱ्या दुकानदाराविरोधात अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली असून, शेतकऱ्यांनीसुद्धा त्यांची कुठे फसवणूक होत असेल किंवा कोणी त्यांच्याकडून जास्त पैसे घेत असेल तर तशी तक्रार प्रशासनाकडे करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे.सध्या शहरासह इतरही तालुक्यात शेतकऱ्यांची बियाणे व खत घेण्यासाठी गर्दी वाढली आहे. अशातच फसवणुकीचे प्रकार सुद्धा घडू शकतात. ते टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्हाभरात आठ भरारी पथके कृषी केंद्र संचालकांवर लक्ष ठेवून असतील व तेथे होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी तत्पर असतील. या भरारी पथकांना कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार असून ते अचानक भेटी देऊन, बियाण्यांची गुणवत्ता, दुकानांची तपासणी, बिलांची तपासणी व दुकानात उपलब्ध असणारा स्टॉक ही माहिती घेऊ शकतात. हे भरारी पथक शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तपासणी करणार असून या पथकाकडे सुद्धा शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास ते करू शकतात.मागील दोन-तीन वर्षात बियाणे विक्रीच्या वेळी लिंकिंग करण्याची पद्धत सर्रास सुरू आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पाहिजे असलेल्या एखाद्या वाणासोबत दुसरे गरज नसणारे किंवा हलक्या प्रतीचे वाण जबरदस्तीने दिले जाते. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिंकिंग आढळल्यास गुन्हे दाखल करू अशी सूचना केली आहे. त्यामुळे कुठल्याही दुकानदाराने शेतकऱ्यांना लिंकिंगच्या माध्यमातून इतर बियाणे किंवा खते देऊ नये. तसे करताना कोणी आढळल्यास कारवाई केली जाईल असे कृषी विभागातर्फे दुकानदारांना कळविण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.