ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ती ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीची एआयची बैठक होती. कौटुंबिक कार्यक्रमात पवार कुटुंब एकत्र येतं, असंही ते म्हणाले.ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील आणि आपण, नुकतीच बंद दाराआड चर्चा झाली..! या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ही तुमची बातमी आहे. ती AI ची बैठक होती. या बैठकीमध्ये बोर्डाने चर्चा केली. त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, जयंत पाटील, डॉ. इंद्रजीत मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, साखर आयुक्त, ज्येष्ठ नेते शरद पवार हे सर्व त्या बैठकीला उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही बैठक होती. असे उत्तर अजित पवारांनी यावेळी दिले.











