आई-वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, पण काळाने डाव साधला, मौज मजा करायला गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत.

 नुकताच आयुष्याला सुरुवात करणाऱ्या युवकाचा असं दुर्दैवी झालेला मृत्यू चटका लावणारा ठरला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. घडशी कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची नोंद रत्नागिरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणी अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.पावसाळ्याच्या दिवसात नदीत, विहिरीत, तळ्यावर पोहायला जाताना काळजी घेणे आवश्यक असते अन्यथा जीवावरती बेतू शकते. अशीच एक दुर्दैवी घटना रत्नागिरी तालुक्यात घडली आहे मित्रांबरोबर पोहायला गेलेल्या युवकाला पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने दुर्दैवीरित्या आपला जीव गमवावा लागला आहे. १७ वर्षीय आदेश दत्ताराम घडशी असे या युवकाच नाव आहे. तो मूळचा देवरुख येथील आहे. या युवकाचारत्नागिरी तालुक्यातील सोमदेव तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आदेश याने नुकतीच यंदा बारावी पास झाला होता. आदेश मूळचा देवरुख येथील आहे.

 

देवरुख येथील रहिवासी व स्थानिक महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला आदेश नुकताच बारावी परीक्षा पास झाला होता. परीक्षेनंतर सुट्टीच्या काळात तो रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथे आपल्या मित्रांसोबत गेला होता. तिथे सोमदेव मंदिराजवळील अंदाजे १५ ते १६ फूट खोल तळ्यात उडी मारल्यानंतर तो पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे गटागळ्या खाऊन बुडाला. तळ्यात पोहायला जाणे आदेशाच्या जीवावर बेतले आहे.ही घटना सोमवार दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. आदेशला पाण्याबाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्याचा श्वास थांबला होता. त्याला तात्काळ डॉक्टरांकडे नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासल्यानंतर आदेशचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे देवरुख परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नुकताच आयुष्याला सुरुवात करणाऱ्या युवकाचा असं दुर्दैवी झालेला मृत्यू चटका लावणारा ठरला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. घडशी कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची नोंद रत्नागिरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणी अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.पावसाळ्याच्या दिवसात पोहायला जाताना काळजी घेणं आवश्यक आहे. स्थानिक परिसराची माहिती नसेल तर अशा ठिकाणी जाताना माहिती घ्यावी. अन्यथा हे धाडस आपल्या जीवावर बेतू शकतं.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.