पोटचा पोरगा झाला वैरी, बायको अन् सासऱ्याच्या मदतीने आईला संपवलं; परदेशातून लेकीचा फोन अन्…

पोटचा पोरगा झाला वैरी, बायको अन् सासऱ्याच्या मदतीने आईला संपवलं; परदेशातून लेकीचा फोन अन्… शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून जन्मदात्या वृद्ध आईची तिचाच मुलगा, सून आणि व्याहीने मिळून संगनमताने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मी ऊर्फ शोभा नारायण महाडिक (वय 62) असे खून झालेल्या वृद्ध आईचे नाव आहे. ही घटना 30 मे रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मुंगशी (ता. माढा) येथे घडली आहे.याबाबत मारुती रामा रेवडे (रा. रेवडे वस्ती अनाळा, ता. परंडा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयताचा मुलगा दत्तात्रय नारायण महाडिक, सून रजनी दत्तात्रय महाडिक (दोघे रा. मुंगशी,ता. माढा), व्याही धर्मराज बागल (रा.ब्रह्मगाव, ता. परंडा, जि. धाराशिव) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वृद्ध लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक यांची गावात आठ एकर शेतजमीन आहे. मृत लक्ष्मी यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी कल्पना धनाजी ढेरे ही विवाहित असून सध्या ती परदेशी ऑस्ट्रिया या देशात नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. महिलेच्या पतीचेही दहा महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. आरोपी मुलगा आणि सून हे दोघे पक्क्या घरात राहतात, तर मयत महिलेचं सुनेशी पटत नसल्याकारणाने घराशेजारीच एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती.शेतीच्या वहिवाटीवरून मयत वृद्ध लक्ष्मी महाडिक तिचा मुलगा आणि सून यांच्यात वारंवार वाद होत होते. सहा महिन्यांपूर्वी आरोपी मुलगा, सून आणि सुनेचे वडील यांनी शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून उसाच्या सरीत महिलेला मारहाण केली होती.मारुती रेवडे यांना ऑस्ट्रियात राहणाऱ्या मयत महिलेच्या मुलीचा व्हॉट्सअॅपवर कॉल आला. तिने सांगितले की, माझ्या आईला शेतामध्ये मारून टाकले आहे. तू जाऊन बघ, मग फिर्यादी अनाळा (ता. परंडा) येथून मुंगशी येथे आत्या शोभाच्या घरी रात्री 11 वाजता पोहोचले. लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक यांच्या घराजवळ लोक जमले होते. उसाच्या शेतामध्ये जाऊन पाहिले असता उसाच्या सरीमध्ये लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक या रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेल्या होत्या. तिच्या डोक्यातून रक्त येत होते, तिचा गळा कपड्याने आवळलेला होता आणि तोंडावर, डोक्यात दगडाने मारल्याच्या खुणा होत्या, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.