महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप? गिरीश महाजनांचे संकेत, घडामोडी कुठपर्यंत जाणार?

 महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं भाकीत वर्तवलं आहे. येत्या आठ दिवसांत ठाकरे गटात कोण राहील आणि कोण जाईल ते स्पष्ट होईल. ठाकरे गटात आठ दिवसांत मोठा भूकंप होईल, असं मोठं भाकीत गिरीश महाजन यांनी वर्तवलं आहे. त्यांच्या या भाकीतामागे कारण देखील तसंच आहे. ठाकरे गटाच्या नाशिकमधील बड्या नेत्याने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यामुळे याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या घडामोडींना सुरुवात देखील झाली आहे. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या आधीच राजकारणात नवे भूंकप होणार असल्याचे संकेत भाजपचे संकटमोचक नेते म्हणून ख्याती असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. गिरीश महाजन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाबाबत मोठं भाकीत केलं आहे. त्यांचं हे भाकीत खरं ठरलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप आलेला बघायला मिळेल. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या नाशिकमधील बड्या नेत्याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांनी वर्तवलेल्या भाकीतला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे पक्ष बांधणीच्या कामांसाठी नाशिकमध्ये आहेत. एकीकडे त्यांचा नाशिक दौरा असताना त्यांच्याच पक्षाचे नाशिकमधील बडे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीनंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर सुधाकर बडगुजर यांनी आपण विविध मांगण्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलो असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाबाबत नवं भाकीत वर्तवलं आहे.”उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण राहणार आणि कोण नाही हे येत्या आठ दिवसांत कळेल”, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. “ठाकरे गट जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. तसेच “ठाकरेंचा पक्ष संपवण्यासाठी एकटे संजय राऊत पुरेसे आहेत”, असंही गिरीश महाजन म्हणाले आहेत.”उद्धव ठाकरे गट हा जमीनदोस्त आणि नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. ते नाशिकला संघटनात्मक दृष्टीकोनावर चर्चा करुन गेले. त्यांच्याकडे आठ दिवसांत कोण राहणार ते बघा. या माणसाच्या (संजय राऊत) बडबडपणामुळे सर्व लोकं परेशान आहेत. मला वाटतं उद्धव ठाकरे हे देखील परेशान असतील. ते आऊट ऑफ कंट्रोल झाले आहे. हा पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत”, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. गिरीश महाजन यांनी वर्तवलेल्या भाकितानंतर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, ते पाहणं महत्त्वाचं आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.