जगन्नाथांची यात्रा ‘सुखोई’च्या चाकांवर; रथाला ४८ वर्षांनंतर नवी चाके, कोलकात्यात होणार प्रथमच उपयोग.

 कोलकात्यातील भगवान जगन्नाथांच्या रथाला ४८ वर्षांनंतर नवी चाके मिळाली असून, तीही थेट रशियाच्या ‘सुखोई’ या लढाऊ विमानासाठी वापरलेली! ताशी २८० किलोमीटर वेगाने उड्डाण करणाऱ्या या लढाऊ विमानाचे टायर आता पारंपरिक रथयात्रेसाठी वापरले जाणार आहेत. भारतातील पुरातन आणि ‘जुगाडू’ संस्कृतीचे एक विलक्षण उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.गेल्या वर्षी प्रथमच ‘इस्कॉन’च्या रथाच्या चाकासाठी टायरची अडचण उद्भवली. त्यावर मात करण्यासाठी इस्कॉनने तातडीने नवीन चाकांसाठी प्रयत्न सुरू केले. यापूर्वी, या रथासाठी ‘बोइंग’ विमानांचे टायर वापरले जात होते. मात्र, आता ते मिळणे अवघड झाल्यामुळे सुखोई विमानांचे टायर निवडण्याचा पर्याय निवडला गेला.

‘सुखोईसाठी टायरची निर्मिती करणाऱ्या ‘एमआरएफ’ कंपनीला रथासाठी टायर देण्याची मागणी आम्ही केल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आम्ही त्यांची चेष्टा करत आहोत, असेच त्यांना वाटले. मात्र, नंतर आम्ही टायरचे कोटेशन मागितल्यावर कंपनीने सुखोईचेच टायर हवे का आणि कशासाठी अशी विचारणा केली,’ अशी माहिती कोलकात्यातील इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी दिली.,जुने टायर मागील ५० वर्षांहून अधिक काळ वापरले जात होते. हे टायर ‘बोइंग बी ७४७’ विमानाचे होते. आता हे विमानच सेवेतूनच बाद झाल्यामुळे, त्याचे टायर उपलब्ध होणे कठीण झाले होते.,‘सुखोई’च्या टायरचा व्यास सुमारे चार फूट असून, ते जंबो जेटच्या टायरच्या आकाराइतके आहे.

या टायरचे वजन ११० किलो आहे.,पूर्वी ‘बोइंग बी ७४७’ विमानासाठी ‘डनलॉप’ कंपनी टायर तयार करीत असे.,सध्या ‘सुखोई’च्या टायरची निर्मिती भारतातील ‘एमआरएफ’ ही कंपनी करते.,नवीन’ सुखोई’ टायरमुळे रथ चालवणे अधिक सोपे होणार आहे.,हे टायर अधिक सुरक्षित असतील आणि त्यामुळे रथ स्थिर राहण्यास मदत होईल.,कोलकात्याच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी ट्रामच्या पट्टचा असल्यामुळे हे टायर फार उपयुक्त ठरतील.,या टायरमुळे रथ ओढणाऱ्या भक्तांची मेहनतही कमी होईल.,२७ जूनपासून सुरू होणाऱ्या रथयात्रेदरम्यान तांत्रिक बिघाड होण्याची शक्यतादेखील कमी होईल.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.