‘बाबागिरी’च्या संशयातून 40 वर्षीय व्यक्तीला संपवलं; नाशिकमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार.

पंचवटी परिसरातील पेठ रोडवर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकाची निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता नाशिक खुनाच्या घटनेने हादरले आहे. पंचवटी परिसरातील पेठ रोडवरील फुलेनगर येथील गौडवाडी परिसरात सोमवारी (दि. 2 जून) मध्यरात्रीच्या सुमारास खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

ही घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महापालिकेच्या 56 नंबर शाळेजवळील प्रवीण किराणा दुकानाजवळ घडली. मृताचे नाव संजय तुळशीराम सासे (40, रा. घर क्र. 1288, महालक्ष्मी चाळ, महाराणा प्रताप नगर, पेठ रोड, पंचवटी) असे आहे.संजय सासे हे ‘बाबागिरी’ करत असल्याचा संशय होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. सोमवारी मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी संजय सासे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून त्यांचा निर्घृण खून केला. या प्रकरणी संजय सासे यांची पत्नी रुपाली संजय सासे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून आतापर्यंत एका संशयित आरोपीला अटक केल्याची माहिती मिळत आहे.   दरम्यान, नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र आहे. चोरी, खून, मारहाण, महिलांवरील अत्याचार, तसेच टोळीगिरीसारख्या गुन्ह्यांनी शहरात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि रहिवासी भागात खुलेआम होणाऱ्या या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. पोलिस यंत्रणा गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न करत असली, तरी गुन्हेगारी रोखण्यासाठी अधिक ठोस आणि प्रभावी उपाययोजना आवश्यक आहेत. वाढत्या गुन्हेगारीला रोखणे हे आता नाशिक पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरणार आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.