धुळ्यात कृषी विभागाची मोठी कारवाई, अधिकाऱ्यांनी चक्क ‘वेशभूषा बदलून’ रचला सापळा, 21 लाखांचं बनावट बियाणे जप्त.

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून, चक्क वेशभूषा बदलून केलेल्या एका धडक कारवाईत धुळे शहर आणि तालुका परिसरातून सुमारे 21 लाख रुपयांचे बनावट आणि भारतात बंदी असलेले बियाणे जप्त केले आहे. बनावट बियाणे, अवैध आणि विनापरवाना खतांची वाहतूक तसेच त्यांची चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने विशेष पथके नियुक्त केली आहेत.या विशेष पथकांनी गोपनीय पद्धतीने केलेल्या कारवाईत एक कार आणि दोन ट्रॅव्हल्समधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचा साठा पकडला. शिरूर चौफुली परिसरात वाशिमहून येत असलेल्या एका कारमधून बियाणे जप्त करण्यात आले.

तर, कमलबाई चौक परिसरात गुजरातहून येत असलेल्या दोन ट्रॅव्हल्समधून मोठ्या प्रमाणावर बियाण्यांचा साठा हस्तगत करण्यात आला.कृषी विभागाच्या माहितीनुसार, ‘विजय ट्रॅव्हल्स’मधून ५० बियाण्यांची पाकिटे सापडली, तर ‘जे.एम.पी.एस. ट्रॅव्हल्स’मध्ये तब्बल 1200 अनधिकृत पाकिटे आढळून आली. विशेष म्हणजे, या ट्रॅव्हल्समध्ये आढळलेली बियाणे भारतात लागवडीसाठी बंदी असलेली होती आणि ती गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी घेऊन जात होती.अरुण श्रीराम तायडे, गुण नियंत्रण अधिकारी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत ही कारवाई केली. ते म्हणाले की, आज ट्रॅव्हल्समध्ये जे बियाणे सापडले.

त्यासोबतच ड्रायव्हरच्या डिक्कीसोबतच जेथे प्रवासी झोपतात तिथे चार बॉक्स मध्ये स्वदेशीचे अंकुर कंपनीचे बियाणे सापडले.अंकुर कंपनीने या आधीच सांगितले होते की यावर्षी स्वदेशी बियाणाची विक्री करणार नाही. त्यामुळे ही पाकिट बनावट आहेत.या तिन्ही वाहनांमधून जप्त केलेल्या बियाण्यांची किंमत अंदाजे २० ते २१ लाख रुपये असून, कृषी विभागाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कृषी अधिकाऱ्यांनी वेशभूषा बदलून ही कारवाई केल्याने बनावट बियाणे विकणाऱ्यांवर चांगलाच वचक बसला असून, शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळता येणार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे व खते खरेदी करावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.