सदाशिव पेठेत 12 जणांना उडवणाऱ्याला गाडीच चालवता येत नाही, येरवडा कारागृहात रवानगी.

 सदाशिव पेठेत भावे हायस्कूलजवळच्या चहाच्या हॉटेलसमोर उभ्या असलेल्या बारा जणांना धडक देणाऱ्या मद्यपी वाहनचालकाला पुणे न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे या वाहनचालकाचा मुक्काम आता येरवडा कारागृहात राहणार आहे. आरोपी चालकाकडे वाहन परवाना नव्हता, त्याला चारचाकी चालविता येत नाही; तसेच त्याने मद्यपान केले होते, असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.जयराम शिवाजी मुळे (वय 27, रा. बिबवेवाडी, मूळ रा. मूळज, ता. उमरगा, जि. धाराशिव) असे कार चालकाचे नाव आहे. अपघातावेळी चारचाकीत असलेला सहप्रवासी राहुल गोसावी (वय 27) आणि मोटारमालक दिगंबर शिंदे (वय 27) यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत; तसेच त्यांना तपासासाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आल्याचे विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक विजयमाला पवार यांनी सांगितले.सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलसमोरून छत्रपती राजाराम मंडळाकडे जाणाऱ्या गल्लीत चहाच्या दुकानासमोर चहा घेत थांबलेल्या बारा जणांना शनिवारी सायंकाळी भरधाव प्रवासी चारचाकीने उडविले होते. आरोपीने मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे; तसेच त्याला चारचाकी चालविता येत नाही.

तरीही त्याने चारचाकी चालविल्याने अपघात घडल्याची माहिती सरकार पक्षातर्फे न्यायालयात देण्यात आली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मुळेला न्यायालयीन कोठडी सुनावली. उपनिरीक्षक गणेश फडतडे तपास करीत आहेत.दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अपघातातील जखमींची भेट घेऊन विचारपूस केली; तसेच या प्रकरणाच्या कारवाईचा आढावा पोलिसांकडून घेतला.दुसरीकडे, पुण्यात भावे हायस्कूलजवळील अपघातात जखमी झालेल्या तरुणांना विशेष बाब म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देण्याची संधी द्यावी, तसेच या विद्यार्थ्यांच्या उपचारांचा भार राज्य सरकारने करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

शनिवारी सायंकाळी पुण्याच्या सदाशिव पेठेतील एका भरधाव गाडीने चहा पित उभ्या असलेल्या 12 तरुणांना उडवले. यात एमपीएससीची तयारी करणारे तरुणही जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी-शप पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.त्यांनी एक्स समाजमाध्यमावर लिहिले की, जखमी विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी प्रदान करणे आवश्यक आहे. यासोबतच सरकारने या विद्यार्थ्यांवरील उपचारांचा खर्च करावा जेणेकरून त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करुन निर्णय घ्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.