धक्कादायक! अमेरिकेत पुन्हा एकदा मास शूटिंग, पार्टी सुरु असताना गोळीबार, एकाचा मृत्यू, 12 जखमी.

अमेरिकेत पुन्हा एकदा मास शीटिंगची घटना घडली आहे. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना प्रांतात एका पार्टीत गोळीबार झाला. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास 12 लोक जखमी झाले आहेत. ही घटना वेस्टर्न नॉर्थ कॅरोलिनाच्या एका निवासी भागात घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना हिकॉरी शहरात रात्री 12.45 वाजता घडली. कटाबा काउंटी शेरिफ कार्यालयाने सांगितले की, सर्व जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन तपास सुरू आहे. नॉर्थ कॅरोलिना स्टेट ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन, हिकॉरी पोलीस विभाग आणि FBI (फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन) मिळून या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

सध्या तरी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गोळीबार नेमका कशामुळे झाला, हे अजून स्पष्ट झालेले नाही. किती गोळ्या झाडल्या गेल्या, याचाही तपास सुरू आहे. पोलिसांनी मृतांची आणि जखमींची नावे जाहीर केलेली नाहीत. त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.अमेरिकेत मास शूटिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, हे चिंताजनक आहे. मास शूटिंग म्हणजे एकाच वेळी अनेक लोकांवर गोळीबार करणे.गेल्या महिन्यात साउथ कॅरोलिनामध्येही अशीच एक घटना घडली होती. एका गर्दीच्या ठिकाणी गोळीबार झाला होता. त्यात 11 लोक गंभीर जखमी झाले होते. होरी काउंटी पोलिसांनी जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचवले.

याआधीही अनेक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी आणि पार्ट्यांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.अमेरिकेत फिलाडेल्फिया शहरातही अशीच एक घटना घडली. एका पार्कमध्ये गोळीबार झाला. यात दोन लोकांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. पोलीस आयुक्त केविन बेथेल यांनी मंगळवार 27 मे रोजी माहिती देताना सांगितले की, “फेअरमाउंट पार्कमध्ये सोमवारी रात्री हा गोळीबार झाला. यात एका पुरुष आणि एका महिलेचा जीव गेला.” अमेरिकेत वारंवार घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.