राज्यात ‘या’ सहा ठिकाणी ‘सीडसा’ केंद्र उभारणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा.

‘कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी बेंगळुरू येथील ‘सेंटर फॉर इनोव्हेशन अँड डेव्हल्पमेंट इन स्मार्ट ॲग्रीकल्चर’ (सीडसा) या कंपनीच्या मदतीने राज्यात नाशिकसह सहा विभागांमध्ये प्रत्येकी एक सीडसा केंद्र उभारण्यात येईल,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली. ‘कीटकनाशक फवारलेल्या शेतमालामुळे नागरिकांना आजार होत आहेत. हे टाळण्यासाठी कृषी विद्यापीठातील प्रयोगशाळा अत्याधुनिक केली जाईल,’ असे त्यांनी जाहीर केले.पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकारातून कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित ‘पुणे आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन’चे उद्‍घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण विभागात सीडसाचे केंद्र सुरू केले जातील.त्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. कीटकनाशक वापरलेल्या शेतमालामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी या कीटकनाशकांची तपासणी करण्याच्या दृष्टीने विद्यापीठातील प्रयोगशाळेला पशुसंवर्धन प्रयोगशाळेप्रमाणे अत्याधुनिक स्वरूप देण्यात येईल,’ असे पवार यांनी सांगितले.

शेतीसमोर बदलत्या हवामानामुळे संकट उभे राहिल्याने कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादन वाढविणे, जलसंधारण आणि सिंचनाच्या नवीन पद्धती, शाश्वत शेती, शेतमालाची विक्री साखळी सुधारणे या दृष्टीने तरुणांना कृषी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासाठी राज्य सरकार शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्तेला (एआय) प्रोत्साहन देत आहे. शाश्वत शेती करताना, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरांवर नियंत्रण आणून ग्राहकांना दर्जेदार शेतमाल मिळाला पाहिजे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यास सरकारचे पाठबळ आहे,’ असे पवार यांनी सांगितले.कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, आमदार बाबाजी काळे, चेतन तुपे, बापू पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रामणी मिश्रा, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट,

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते.कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, ‘कृषी क्षेत्रात मनुष्यबळाअभावी अडचणी निर्माण होणार आहेत, हा धोका ओळखून कर्नाटकातील ४० आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी एकत्र येऊन, कृषी क्षेत्रातील मानव विरहित अवजारे आणि तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. यामध्ये मानवरहित ट्रॅक्टर, मानवरहित ड्रोन विविध तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या सर्व तंत्रज्ञानाच्या वापरातून महाराष्ट्रातील शेती संरक्षित, सुरक्षित आणि शाश्वत करण्याचे धोरण आहे. यासाठी या कृषी हॅकेथॉनच्या माध्यमातून नवनवीन संशोधन शेतीमध्ये येईल.’ मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. महानंद माने यांनी आभार मानले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.