ठाकरेसेनेला मोठा झटका, नाराज शिलेदाराच्या मुलीच्या लग्नाला शिंदेंची हजेरी, शिवबंधन सोडणार?

शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला आज, मंगळवार दिनांक 2 मे रोजी हजेरी लावणार आहेत. विलास शिंदे हे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लग्नाला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याने चर्चा सुरू झाली आहे.गत विधानसभा निवडणुकीपूर्वी घडलेल्या बऱ्याच राजकीय घडामोडींमध्ये शिवसेनेचे दोन गटांत रूपांतर झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट अशा दोन गटांमध्ये शिवसेना विभागली गेली. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात राज्यात महायुतीची सत्ता आली.

शिवसेना शिंदे गट हा या महायुतीमधील घटक पक्ष असून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीआता महापालिका निवडणुका जिंकण्याचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले असून अशातच राजकीय घडामोडीही जोर धरत आहेत. शिवसेना ठाकरे गटात नाराज असलेल्या नाशिकमधील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपसह शिवसेना शिंदे गटाकडून सुरू आहे. अशातच विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण स्वीकारून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर शिंदे यांच्याकडून जाळे टाकण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतदेखील या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने घडामोडींकडे लक्ष लागले आहे.राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हेदेखील एका विवाह सोहळ्यानिमित्त आज (दि. 2) नाशिकमध्ये येत आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याच विवाह सोहळ्यानिमित्त नाशिक मुक्कामी असून, आज व्हीव्हीआयपींची शहरात मांदियाळी असणार आहे.याआधी, काल नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आले होते. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विशेष म्हणजे ऐन वाढदिवशीच बालाजी कल्याणकर यांची प्रकृती बिघडल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.