हार्दिक कोसळला, रोहित निराश, नीता अंबानींनी डोक्याला लावला हात; मुंबई हरताच भावनिक फोटो पाहून चाहते हळहळले.

 आयपीएल 2025 चा दुसरा क्वालिफायर सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. पंजाबने हा हाय स्कोअरिंग सामना 5 विकेट्सने जिंकला आणि अंतिम फेरीत स्थान मिळवले. यावेळी आयपीएलला एक नवीन विजेता मिळणार आहे. आरसीबी किंवा पंजाबने आतापर्यंत आयपीएल जिंकलेलr नाही. त्याच वेळी, पराभवानंतर मुंबईच्या संघाचे अनेख निराश चेहरे दिसून आले. आता हे निराश चेहऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होता आहे.मुंबई इंडियन्सची मालक नीता अंबानीच्या संपूर्ण सामन्यादरम्यान वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या गेल्या. डोक्याला हात लावून बसलेल्या पाहायला मिळाल्या. त्यांचा हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा देखील निराश दिसत होता. जेव्हा श्रेयस अय्यर लांब षटकार मारत होता तेव्हा हिटमॅनचा चेहरा पडला होता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या सामना गमावल्यानंतर जमिनीवर बसला. तो खूप भावनिक झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने त्याचे सांत्वन केले. युवा वेगवान गोलंदाज अश्विनी कुमारही सामना गमावल्यानंतर भावनिक झाला. जसप्रीत बुमराहनेही त्याचे सांत्वन केले.


पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 203 धावांचा डोंगर उभा केलेला पाहायला मिळाला. याउलट पंजाबने हा डोंगर सहजरित्या पार केलेला पाहायलाही मिळाला. पंजाबकडून कर्णधार श्रेयस अय्यरने कर्णधाराला साजेशी खेळी खेळली. श्रेयसने नाबाद 87 धावा केल्या तर नेहल वडेराने 48 धावा केल्या. जॉश इंग्लिशने 38 धावांचे योगदान दिले.प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या महत्त्वाच्या सामन्यात विशेष जादू दाखवू शकले नाही. प्रियांश केवळ 20 धावाच करु शकला तर प्रभसिमरन सिंग हा केवळ 6 धावाच करु शकला. शशांक सिंग आणि मार्कस स्टोनिइसने प्रत्येकी 2-2 धावा केल्या. पंजाबकडून सर्वाधिक विकेट 2 विकेट या अझमतुल्लाह ओमरझाईने काढल्या.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.